पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी राज मुजावर
राज मुजावर हे महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य असून टी डी एफ संघटनेत अनेक वर्ष कार्यरत आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघ (Pune City Secondary Teachers Union) अध्यक्षपदी राज मुजावर (Raj Mujawar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ)चे प्रदेश अध्यक्ष नानासाहेब बोरस्ते यांच्या हस्ते मुजावर यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी, टीडीएफचे कार्याध्यक्ष जी. के. थोरात, मुरलीधर मांजरे (अध्यक्ष, पुणे जिल्हा माध्यमिक संघ), वसंतराव ताकवले (अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी-टीडीएफ) यांनी मुजावर यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले.
एज्युवार्ता बाल गणेशोत्सव स्पर्धा ; खास शालेय विद्यार्थ्यांसाठी , बक्षिसांची लयलूट करण्याची संधी
राज मुजावर हे महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य असून टी डी एफ संघटनेत अनेक वर्ष कार्यरत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून टीडीएफ संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी मांडून सोडवण्याच्या ते प्रयत्न करत आहेत.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.