आरटीई प्रवेश अर्जांची मुदत संपली; १ लाख जागांसाठी ३ लाखांपेक्षा अधिक अर्ज    

 शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) खासगी इंग्रजी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्याची मुदत रविवारी संपल्याने प्रवेश अर्जासाठी अर्ज करण्याची मुदत संपली आहे.

आरटीई प्रवेश अर्जांची मुदत संपली; १ लाख जागांसाठी ३ लाखांपेक्षा अधिक अर्ज    

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) खासगी इंग्रजी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत अर्ज (RTE Admission Process) करण्याची मुदत रविवारी संपल्याने (RTE admission application deadline has expired) आता प्रवेश अर्ज करता येणार नाही. त्यामुळे 1 लाख 9 हजार 111  जागांसाठी दाखल झालेल्या अर्जाचा आकडा समोर आला आहे. अर्ज मुदतीपूर्वी 3  लाख 5  हजार 960 अधिक अर्ज प्राप्त झाले असून, आता प्रवेशासाठी पुढील काही दिवसांत सोडत काढण्यात येणार आहे. 

संपूर्ण आरटीई प्रवेश प्रक्रिया ही प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे राबवण्यात येत आहे. आरटीईअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या खासगी  शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. प्रवेशित विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून शाळांना करण्यात येते. यंदा राज्यभरातील ८ हजार ८६३ शाळांमधील १ लाख ९ हजार १११ जागांसाठी तीन लाखांहून अधिक अर्ज पालकांनी दाखल केले आहेत. 

या प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी १४ ते २७ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या मुदतीत अर्ज भरू न शकलेल्या पालकांना संधी मिळण्यासाठी २ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्याच वेळी या पुढे पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आरटीई संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार सोमवारी सकाळपर्यंत एकूण ३ लाख ५ हजार ९६० अर्ज दाखल झाले आहेत. 
_______________________________

आरटीई प्रवेश प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठीची मुदत संपली आहे. या प्रक्रियेत साधारणपणे दरवर्षी एवढेच अर्ज आले आहेत. आता प्रवेशासाठीची सोडत काढून प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची यादी आणि प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.

शरद गोसावी, प्राथमिक शिक्षण संचालक