IOB Recruitment 2024: इंडियन ओवरसीज बँकेत 500 हून अधिक पदांची भरती
अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर असणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
इंडियन ओव्हरसीज बँकेने (Indian Overseas Bank recruitment) भरतीची अधिसूचना प्रसिध्द केली आहे. त्यानुसार बँकेत 550 जागांवर अप्रेंटिस करण्याची संधी मिळणार आहे.पात्र आणि इच्छुक उमेदवार (candidates) https://www.iob.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या भरतीसाठी अर्ज (Application for recruitment) करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर असणार आहे.
इंडियन ओव्हरसीज बँकेतील या भरती मोहिमेद्वारे, एकूण 550 अप्रेंटिस पदांची भरती केली जाईल. या भरती मोहिमेसाठी अर्ज करणारा उमेदवार देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 944 रुपये शुल्क भरावे लागेल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७०८ रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. तर, PwBD श्रेणीतील उमेदवारांना 472 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, स्थानिक भाषा चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट iob.in वर जावे. यानंतर, उमेदवाराच्या मुख्यपृष्ठावरील संबंधित भरती लिंकवर क्लिक करा. आता उमेदवारांनी नोंदणी करावी. नंतर उमेदवार लॉगिन क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करा. आता उमेदवार अर्जामध्ये विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करा यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर उमेदवार अर्ज फी भरा. आता उमेदवार अर्ज डाउनलोड करा आणि अर्जाची प्रिंट आउट घ्या.