मुंबई विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्राचे वेळापत्रक जाहीर
LLB (3 वर्षे) सत्र 5 आणि LLB (5 वर्षे) सत्र 9 ची परीक्षा 19 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मुंबई विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्राच्या (2nd Semester of Bombay University) परीक्षेचे वेळापत्रक जाहीर (Timetable Announced) करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा (Exams) येत्या २३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मुंबई विद्यापीठाने बीकॉम (B.com), बीए (BA), बीएससी (BSC) अभियांत्रिकी (Engineering), आर्किटेक्चर (Architecture), फार्मसी (Pharmacy), एमसीए (MCA), विज्ञान शाखेच्या आणि समकक्ष पदवी (Science and equivalent Degree) आणि पदव्युत्तर परीक्षांच्या (Post Graduate Examinations) तारखा जाहीर केल्या आहेत.
हिवाळी सत्र 2024 साठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांपैकी तृतीय वर्ष बी.कॉम, बी.कॉम फायनान्शिअल मार्केट, बँकिंग आणि विमा, लेखा आणि वित्त आणि वाणिज्य आणि प्रशासन प्रवाह अंतर्गत बीएमएस सत्र 5 च्या परीक्षा 23 ऑक्टोबर 2024 पासून घेण्यात येणार आहेत. तर तृतीय वर्ष बीए सत्र 5 ची परीक्षा 13 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. तसेच LLB (3 वर्षे) सत्र 5 आणि LLB (5 वर्षे) सत्र 9 ची परीक्षा 19 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रवाह तिसरे वर्ष B.Sc., B.Sc (संगणक विज्ञान), (बायोटेक्नॉलॉजी), (माहिती तंत्रज्ञान), (फोरेन्सिक्स) आणि (डेटा सायन्स) सत्र पाचची परीक्षा 13 नोव्हेंबर 2024 पासून घेतली जाईल.
दरम्यान, सर्व परीक्षांचे तपशीलवार वेळापत्रक मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे विद्यपीठकडून स्पष्ट करण्यात आले आहे.