कोचिंग क्लासेसच्या शिखर संघटना अध्यक्षपदी डॉ. पी. कुलकर्णी यांची निवड; नऊ संघटना पाठिंबा

मुंबईत महाराष्ट्रातील नऊ कोचिंग क्लासेस संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्टेट कॉन्सोर्टियम ऑफ कोचिंग टीचर्स अँड इन्स्टिट्यूट महाराष्ट्र या शिखर संघटनेच्या अध्यक्षपदी साताऱ्याचे डॉ. प्रशांत गणेश उर्फ पी. कुलकर्णी यांची एकमताने निवड करण्यात आली. या संघटनेमध्ये महाराष्ट्रातील विविध प्रदेशांतील नऊ संघटना एकत्रित काम करतात.

कोचिंग क्लासेसच्या शिखर संघटना अध्यक्षपदी डॉ. पी. कुलकर्णी यांची निवड; नऊ संघटना पाठिंबा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मुंबईत महाराष्ट्रातील नऊ कोचिंग क्लासेस संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्टेट कॉन्सोर्टियम ऑफ कोचिंग टीचर्स अँड इन्स्टिट्यूट महाराष्ट्र या शिखर संघटनेच्या अध्यक्षपदी साताऱ्याचे डॉ. प्रशांत गणेश उर्फ पी. कुलकर्णी यांची एकमताने निवड करण्यात आली. या संघटनेमध्ये महाराष्ट्रातील विविध प्रदेशांतील नऊ संघटना एकत्रित काम करतात. त्यामध्ये प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य (पिटीए), मुंबई क्लास ओनर्स असोसिएशन, कोचिंग क्लासेस प्रोप्रायटर असोसिएशन ठाणे, असोसिएशन ऑफ कोचिंग क्लास ओनर्स अँड मेंटॉर्स मुंबई, असोसिएशन ऑफ कोचिंग इन्स्टिट्यूट नागपूर, खाजगी कोचिंग क्लासेस संघ नागपूर, कोचिंग क्लासेस वेल्फेअर असोसिएशन नाशिक आणि कोचिंग क्लासेस असोसिएशन छत्रपती संभाजीनगर यांचा समावेश आहे. या सर्व संघटनांनी एकत्र येऊन मुंबईत ही शिखर संघटना स्थापन केली आहे.

महाराष्ट्र शासन कोचिंग क्लासेसच्या नियमन आणि नियंत्रणासाठी नवीन कायदा आणण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो खाजगी कोचिंग क्लास संचालकांची बाजू सरकारसमोर एकत्रित आणि प्रभावीपणे मांडण्यासाठी ही शिखर संघटना स्थापन करण्यात आली. डॉ. पी. कुलकर्णी हे आधीच प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे राज्य अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांमध्ये सक्रिय आहेत. त्यांच्या अनुभवाच्या आणि नेतृत्वगुणांच्या जोरावर त्यांना आता या व्यापक जबाबदारीची सूत्रे सोपविण्यात आली आहेत.

नवीन अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर डॉ. कुलकर्णी यांना नऊ संघटनांना एकत्रित ठेवून राज्यातील सर्व क्लास संचालकांच्या हिताचे रक्षणह करण्याचे आव्हान आहे. शिखर संघटनेच्या माध्यमातून सरकारशी संवाद साधून योग्य धोरणे तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या निवडीमुळे कोचिंग क्षेत्रातील विविध घटकांमध्ये एकजूट निर्माण होईल आणि त्यांच्या समस्यांना अधिक वजनदार आवाज मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.डाॅ. कुलकर्णी यांच्या च्या नेतृत्वाखाली शिखर संघटना कोचिंग क्लासेसच्या हितरक्षणासाठी प्रभावी भूमिका बजावेल, असा विश्वास सर्वत्र व्यक्त होत आहे.