विद्येच्या माहेरघरातील संस्थाच NIRF रँकिंगमध्ये पिछाडीवर; पुण्यातील टॉप कॉलेज पाहा एका क्लिकवर...
मागील वर्षी NIRF रँकिंगमध्ये विद्यापीठांच्या क्रमवारीत १२ व्या क्रमांकावर असणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची १९ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालयातर्फे देशभरातील विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांचे NIRF रँकिंग जाहीर करण्यात आले असून त्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत पुण्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांची (Universities and Colleges in Pune) घसरण झाली असल्याचे दिसून येत आहे. तर काही संस्थांनी रँकिंग (Institutional Ranking) मध्ये आघाडी घेतल्याचेही दिसत आहे.एकूणच विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील शैक्षणिक संस्था कुठे आहेत, याचा आरसा या रँकिंगने दाखवून दिला आहे. (Top Educational Institutes in Pune)
मागील वर्षी NIRF रँकिंगमध्ये विद्यापीठांच्या क्रमवारीत १२ व्या क्रमांकावर असणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची (SPPU) १९ व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. सिम्बायोसिस विद्यापीठ मागील वर्षी व या वर्षी सुद्धा ३२ व्या क्रमांकावर कायम आहे. मात्र डॉ.डी वाय पाटील विद्यापीठ ४१ क्रमांकावरून ४६ क्रमांकावर तर भारती विद्यापीठ ७६ वरून ९१ व्या क्रमांकावर घसरले आहे.
रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये मागील वर्षी १७ व्या क्रमांकावर असणारे पुण्यातील आयसर इन्स्टिट्यूट यावर्षी २७ व्या क्रमांकावर घसरले आहे. महाविद्यालय गटात मागील वर्षी देशात ५७ व्या क्रमांकावर असणारे फर्गसन महाविद्यालय यंदा ७९ क्रमांकावर जाऊन पोहोचले आहे. असे असले तरी पुण्यातील हे या गटातील एकमेव महाविद्यालय आहे. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सीओईपी ७२ क्रमांकावरून ७३ क्रमांकावर पोहोचले असले तरी डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या इन्स्टिट्यूटने शैक्षणिक दर्जा वाढवत ७१ वरून ५७ वा क्रमांक गाठला आहे.
मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये सिम्बॉयसिस सतराव्या क्रमांकावर कायम असून एनआयबीएम ७६ क्रमांकावर आहे. तर फार्मसी इन्स्टिट्यूटमध्ये पुना कॉलेज ऑफ फार्मसी २९ व्या क्रमांकावर असून डॉ. डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल सायन्स अँड रिसर्च ४५ व्या क्रमांकावर आहे. तर एसएम एस कॉलेज ऑफ फार्मसी ९३ क्रमांकावर आणि डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी ९४ क्रमांकावर आणि मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी ९६ स्थानी आहे.
NIRF 2023 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रँकिंगमध्ये मोठी घसरण; देशात ३५ व्या क्रमांकावर
मेडिकल यूनिवर्सिटी मध्ये डॉ. डी वाय पाटील विद्यापीठ यावर्षी १७ क्रमांकावरून १५ क्रमांकावर पोहचले आहे.तर डेंटलमध्ये डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठ देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे.विधी अभ्यासक्रमात देशात तिसऱ्या क्रमांकावर असणारे सिम्बॉयसिस लॉ स्कूल यावर्षी सहाव्या क्रमांकावर खाली आले आहे.
विद्यापीठे
१. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
२. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ
३. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ
४. भारती विद्यापीठ
महाविद्यालये
१. फर्ग्यूसन महाविद्यालय
संशोधन संस्था
१. आयसर इन्स्टिट्यूट
अभियांत्रिकी
१. डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी
2. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सीओईपी)
व्यवस्थापन
१. सिम्बॉयोसिस
२. एनआयबीएम
औषधनिर्माणशास्त्र
१. पुना कॉलेज ऑफ फार्मसी
२. डॉ. डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल सायन्स अँड रिसर्च
३. एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ फार्मसी
४. डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी
५. मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी
मेडिकल व डेंटल
१. डॉ. डी वाय पाटील विद्यापीठ
विधी
१. सिम्बॉयोसिस लॉ स्कूल
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.