दहावी उत्तीर्णांसाठी BHEL मध्ये ६६० पदांची मोठी भरती संधी; अर्ज प्रक्रिया सुरू
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने (BHEL) ६६० जागांसाठी भरती जाहीर केली आहे. दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील ITI किंवा NAC पात्रता असलेल्या उमेदवारांना ही संधी उपलब्ध आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार असून अंतिम तारीख १८ नोव्हेंबर २०२६ आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

या भरती मोहिमेअंतर्गत फिटर, वेल्डर, टर्नर, मशीनिस्ट, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आणि फाउंड्रीमन या ट्रेडमधील पदे भरली जाणार आहेत. फिटरसाठी २७८, वेल्डरसाठी १०४, टर्नरसाठी ५२, मशीनिस्टसाठी १०१, इलेक्ट्रिशियनसाठी ९०, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकसाठी २३ आणि फाउंड्रीमनसाठी १२ जागा आहेत. अशा प्रकारे एकूण ६६० पदे उपलब्ध आहेत. संबंधित ट्रेडमधील अनुभवी किंवा प्रशिक्षित तरुणांना याद्वारे चांगली संधी मिळणार आहे.

पात्रतेबाबत उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संबंधित ट्रेडमध्ये किमान ६० टक्के गुणांसह ITI किंवा NAC प्रमाणपत्र आवश्यक आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी ही अट ५५ टक्के गुणांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. वयाबाबत १ ऑक्टोबर २०२६ रोजी उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे. SC आणि ST उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत पाच वर्षे तर OBC उमेदवारांना तीन वर्षे सूट देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क खुल्या प्रवर्ग, OBC आणि EWS उमेदवारांसाठी १०७२ रुपये तर SC, ST, दिव्यांग आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी ४७२ रुपये आहे. निवड झालेल्या उमेदवारांना तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथील BHEL युनिट्समध्ये काम करण्याची संधी मिळेल. निवड प्रक्रिया जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे राहील.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. पदनिहाय पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर अटी तपासूनच अर्ज करावा, आवाहन करण्यात आले आहे.