गणपत मोरे यांची बदली नवे शिक्षण उपसंचालक मच्छिंद्रनाथ कदम
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक पदी काही वर्षांपूर्वी नियुक्त झालेल्या गणपत मोरे यांची बदली योजना विभागात करण्यात आली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात उपसंचालक पदावर कार्यरत असलेले गणपत मोरे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर मच्छिंद्रनाथ कदम यांची पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक म्हणून पद निश्चिती करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काळात कदम हे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.
पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांचा शैक्षणिक कार्यभार पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या माध्यमातून पार पाडला जातो. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक पदी जून २०२५ मध्ये नियुक्त झालेल्या गणपत मोरे यांची बदली योजना विभागात करण्यात आली आहे.
गणपत मोरे यांच्या जागेवर मुंबईतील शिक्षण अधिकारी मच्छिंद्रनाथ कदम यांची बदली करण्यात आली आहे. राज्य शासनातर्फे बदली आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अनेक कामे प्रलंबित आहेत शिक्षक व शिक्षक केंद्र कर्मचाऱ्यांची कामे वेळेवर होत नाहीत. त्यामुळे शिक्षक वर्गात मोठी नाराजी होती. आता कदम शिक्षक वर्गातील ही नाराजी कशी दूर करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.