रेल्वेत स्टेशन मास्टर पदांसाठी १२५० जागांवर महाभरती; २७ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू

भारतीय रेल्वेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या पदवीधर तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) स्टेशन मास्टर या प्रतिष्ठित पदासाठी तब्बल १२५० रिक्त जागांवर मोठी भरती जाहीर केली आहे. केंद्रीय रोजगार अंतर्गत ही भरती होणार असून, पूर्वी एनटीपीसी प्रक्रियेत समाविष्ट असलेले हे पद यंदा स्वतंत्रपणे भरले जाणार आहे.

रेल्वेत स्टेशन मास्टर पदांसाठी १२५० जागांवर महाभरती; २७ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

भारतीय रेल्वेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या पदवीधर तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) स्टेशन मास्टर या प्रतिष्ठित पदासाठी तब्बल १२५० रिक्त जागांवर मोठी भरती जाहीर केली आहे. केंद्रीय रोजगार अंतर्गत ही भरती होणार असून, पूर्वी एनटीपीसी प्रक्रियेत समाविष्ट असलेले हे पदे स्वतंत्रपणे भरले जाणार आहेत. यामुळे स्पर्धा अधिक सुटसुटीत होणार आणि प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना अधिक संधी मिळणार आहे.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २७ ऑक्टोबर २०२६ पासून अधिकृत संकेतस्थळ rrbapply.gov.in वर सुरू होईल आणि अंतिम मुदत २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत असेल. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी धारण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात. वयोमर्यादा किमान २० वर्षे आणि कमाल ३० वर्षेनिश्चित करण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल.

परीक्षा प्रक्रिया यापूर्वीच्या दोन टप्प्यांच्या ऐवजी एकाच टप्प्याची संगणकाधारित परीक्षा असेल. ही १०० गुणांची परीक्षा १२० मिनिटांत होईल. त्यात बेसिक सायन्स व गणित आणि डेटा अॅनालिसिससाठी ६० गुण, लॉजिकल कॅपेबिलिटीसाठी २० गुण आणि मेंटल रिझनिंगसाठी २० गुण असतील. गुणवत्तेनुसार जागांच्या आठ पट उमेदवारांना संगणकाधारित अभिक्षमता चाचणी (CBAT) साठी बोलावले जाईल. अंतिम निवडीत संगणकीय परीक्षेचे ७० टक्के आणि अभिक्षमता चाचणीचे ३० टक्के गुण विचारात घेतले जातील. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि ए-२ वैद्यकीय मानकानुसार तपासणी होईल.

अर्ज शुल्क सामान्य, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ५०० रुपये असून त्यापैकी ४०० रुपये परत मिळतील. अनुसूचित जाती-जमाती, महिला आणि दिव्यांग उमेदवारांसाठी २५० रुपये शुल्क पूर्णपणे परत केले जाईल. अर्जातील चुका टाळण्यासाठी आधार कार्डावरील नाव, वडिलांचे नाव आणि जन्मतारीख दहावीच्या गुणपत्रकाशी तंतोतंत जुळतील याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे..