दहावी उत्तीर्णांसाठी नोकरीची मोठी संधी; हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांसाठी भरती सुरू
महाराष्ट्र राज्यात २६ शाखांद्वारे सुमारे १५०० कोटींचा व्यवसाय करणाऱ्या दि हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबईने कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या दोन पदांसाठी एकूण ११० जागांची भरती जाहीर केली आहे. या सुवर्णसंधीमुळे बेरोजगार युवकांमध्ये आनंद पसरला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्यात २६ शाखांद्वारे सुमारे १५०० कोटींचा व्यवसाय करणाऱ्या दि हिंदुस्थान को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबईने कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या दोन पदांसाठी एकूण ११० जागांची भरती जाहीर केली आहे. या सुवर्णसंधीमुळे बेरोजगार युवकांमध्ये आनंद पसरला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत. बँकेच्या कार्यक्षेत्रात स्थिर नोकरी मिळण्याची ही उत्तम संधी आहे.
या भरती मोहिमेअंतर्ग कनिष्ठ लिपिक पदासाठी ६० जागा उपलब्ध आहेत. यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक असून संगणकाचे ज्ञान तसेच मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा २२ ते ३५ वर्षे ठेवण्यात आली आहे. परीक्षेत जनरल नॉलेज, अॅप्टिट्यूड, रिझनिंग, गणित, मराठी-इंग्रजी व्याकरण, संगणक साक्षरता आणि बँकिंग या विषयांवर प्रश्न विचारले जातील. परीक्षा मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमांत होईल.

शिपाई पदासाठी ५० जागा आहेत. किमान दहावी उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा २१ ते ३३ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. परीक्षेत जनरल नॉलेज, मराठी, प्राथमिक इंग्रजी आणि सामान्य गणित यांचा समावेश असेल. परीक्षा मुख्यत्वे मराठी माध्यमात घेतली जाईल. दोन्ही पदांसाठी निवड प्रक्रिया ९० गुणांची ऑनलाईन परीक्षा, पाच गुणांची तोंडी मुलाखत आणि पाच गुण विशेष गुणवत्तेसाठी अशी एकूण शंभर गुणांची राहील. परीक्षेचा कालावधी नव्वद मिनिटांचा असून सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतील.
ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत १७ ऑक्टोबर २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे. परीक्षा शुल्क एक हजार रुपये अधिक अठरा टक्के जीएसटी व बँक चार्जेस इतके असून ते फक्त ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारेच स्वीकारले जाईल. पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन वेळेत अर्ज करावा जेणेकरून ही मोठी संधी हातातून निसटू नये.