RTE प्रवेशासाठी मुदतवाढ मिळणार ? केवळ 28 हजार 289 विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

केवळ 28 हजार 289 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून अद्याप 73 हजार 678 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. त्यामुळे प्रवेश घ्यायला आता केवळ दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

RTE प्रवेशासाठी मुदतवाढ मिळणार ?  केवळ 28 हजार 289 विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची (RTE Admission Process) शिक्षण विभागाने पहिली गुणवत्ता यादी (First merit list) जाहीर केली. निवड यादीतील प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांना (students) 28 फेब्रुवारीपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. परंतु, मुदत संपायला दोन दिवस बाकी असताना केवळ 28 हजार 289 विद्यार्थ्यांनीच आपला प्रवेश निश्चित केला आहे.

यंदा या प्रवेश प्रक्रियासाठी राज्यभरातील 8 हजार 863 शाळांमधील 1 लाख 9  हजार 87 जागांसाठी 3 लाख 5 हजार 152 अर्ज दाखल झाले होते. त्यातून या प्रवेश प्रक्रियेसाठी 1 लाख 1 हजार 967 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यापैकी केवळ 28 हजार 289 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून अद्याप 73 हजार 678 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. त्यामुळे प्रवेश घ्यायला केवळ दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.मात्र, फारच कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यामुळे शिक्षण विभागाकडून प्रवेशासाठी मुदतवाढ दिली जाणार का ? याकडे पालकांचे लक्ष आहे.त्यामुळे शिक्षण विभाग काय निर्णय घेणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.   

दरम्यान, आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 या वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेशपात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस (msg) प्राप्त होतील. परंतु पालकांनी फक्त एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीईच्या अधिकृत पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी, असेही शिक्षण विभागामार्फत सांगण्यात आले आहे.