एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
रेल्वे भरती बोर्ड (
Railway Recruitment Board) RRB ने आज, 7 ऑक्टोबर रोजी रेल्वे परीक्षांच्या तारखा जाहीर (
Railway exam date announced) केल्या आहेत. ALP, RPF SI, तंत्रज्ञ, JE आणि इतर पदांसाठी भरती परीक्षांसाठी अर्ज करणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट
rrbapply.gov.in वर वेळापत्रक तसेच शहर माहिती यादी तपासू शकतात.
RRB ने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, RRB ALP (CEN 01/2024) साठी CBT 1 परीक्षा 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2024 दरम्यान आयोजित केली जाईल. तर RPF SI (CEN RPF 01/2024) परीक्षा 2 ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीत घेतली जाईल. RRB तंत्रज्ञ (CEN 02/2024) भरती परीक्षा 16 ते 26 डिसेंबर 2024 दरम्यान आयोजित केली जाईल. याशिवाय, JE आणि इतरांसाठी CBT 1 परीक्षा (CEN 03/2024) 6 डिसेंबर ते 13 डिसेंबर 2024 या कालावधीत देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल.
परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी परीक्षा केंद्रावर उमेदवारांचे आधार लिंक केलेले बायोमेट्रिक प्रमाणीकरण केले जाईल. यासाठी उमेदवारांनी मूळ आधार कार्ड आणणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रात सुलभ प्रवेशासाठी उमेदवारांना त्यांच्या ओळखपत्रांसह rrbapply.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करून आधार पडताळणीद्वारे त्यांची ओळख प्रमाणित करण्याचा सल्ला RRB ने दिला आहे.