NMMS परीक्षेच्या विद्यार्थी गुणांची यादी जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 22 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या 'राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना' एनएमएमएस परीक्षेची विद्यार्थ्यांना प्राप्त झालेल्या गुणांची यादी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यार्थी www.mscpune.in व mscenmms.in या संकेतस्थळावर गुणांची यादी पाहू शकतात.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा ही मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत राबविले जाते. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना तसेच त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण व्हावे, हा या योजनेचा मुख्य गाभा आहे. 2017-18 पासून शिष्यवृत्तीचा दर प्रतिवर्षी 12 हजार रुपये व दरमहा 1000 रुपये असा आहे.
या यादीमध्ये विद्यार्थ्याचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, आईचे नाव, यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड इत्यादी मध्ये दुरुस्ती असल्यास दुरुस्तीसाठी 18 फेब्रुवारी पर्यंत मदत देण्यात आली आहे.संबंधित शाळेच्या लॉगिन मध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ऑनलाइन आलेल्या अर्ज व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या स्वीकारल्या जाणार नाही. तसेच दिलेल्या मुदतीत प्राप्त झालेल्या दुरुस्त्यांचाच विचार केला जाणार आहे.