SSC सीजीएल टायपिंगची 18 जानेवारी रोजी झालेली परीक्षा रद्द

SSC CGL टाईपिंग परीक्षा रद्द करण्यासोबतच आयोगाने परीक्षेची नवीन तारीखही जाहीर केली आहे. या परीक्षेला बसणारे उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाइट https://ssc.gov.in/ ला भेट देऊन नवीन तारखा तपासू शकतात. 

SSC सीजीएल टायपिंगची 18 जानेवारी रोजी झालेली परीक्षा रद्द

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या  (staff selection commission-SSC) सीजीएल टायपिंगच्या 18 जानेवारी रोजी झालेल्या परीक्षेस उपस्थित राहिलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. SSC ने  यासंदर्भात अधिकृत अधिसूचना प्रसिध्द केली आहे. त्यानुसार १८ जानेवारी २०२५ रोजी दुसऱ्या शिफ्टमध्ये झालेल्या CGL टायपिंग टेस्ट (डेटा एंट्री स्पीड) मध्ये तांत्रिक त्रुटी आढळून आल्या आहेत. ज्यामुळे ही परीक्षा आता रद्द करण्यात आली आहे. (CGL typing exam held on January 18th cancelled) आता ही परीक्षा  ३१ जानेवारी २०२५ रोजी पुन्हा घेण्यात येईल.

 परीक्षा रद्द करण्याबरोबरच आयोगाने परीक्षेची नवीन तारीखही जाहीर केली आहे. या परीक्षेला बसणारे उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाइट https://ssc.gov.in/ ला भेट देऊन नवीन तारखा तपासू शकतात. आता ही परीक्षा पुन्हा ३१ जानेवारी २०२५ रोजी घेतली जाईल. (This exam will be conducted again on January 31, 2025.) परीक्षा सुरू होण्याची वेळ दुपारी १:०० वाजेपासून असेल. तर परीक्षेसाठी प्रवेशपत्र अपलोड करण्याची संभाव्य तारीख २७ जानेवारी २०२५ असेल. 
CGL टियर १ चा निकाल ५ डिसेंबर २०२४ रोजी जाहीर झाला होता. पहिल्या टप्प्यात यशस्वी झालेल्या उमेदवारांना दुसऱ्या टप्प्यात उपस्थित राहावे लागले, ही परीक्षा  १८, १९ आणि २० जानेवारी २०२५ रोजी झाली. आता १८ जानेवारी २०२५ रोजी दुसऱ्या शिफ्टमध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत तांत्रिक समस्या आढळून आली आहे. ज्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली असून आता ही परीक्षा  ३१ जानेवारी २०२५ रोजी पुन्हा घेण्यात येईल.