डॉ. गौरव गमरे यांना पीएच.डी जाहीर

गमरे यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान या शाखेत प्रबंध सादर केला आहे.

डॉ. गौरव गमरे यांना पीएच.डी जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे नौरोसेजी वाडिया महाविद्यालयाच्या भूगोल विभागात कार्यरत असणारे गौरव सुरेश गमरे यांना पीएच.डी  जाहीर करण्यात आली आहे. गमरे यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान या शाखेत प्रबंध सादर केला आहे. त्यांना पीएच.डी साठी भूगोल विभागाचे प्रमुख प्रो.डॉ.अनरघा अमित धोर्डे यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांनी 'मोरफो-सेडीमेंटॉलॉजिकल स्टडी ऑफ बॅरिअर बीच सिस्टिम अलोंग दिवेअगर फ्रॉम सेंट्रल कोकण कोस्ट, महाराष्ट्र' या विषयात शोधप्रबंध सादर केला.