पोस्ट ऑफिस GDS DV यादी जाहीर; असा तपासा तुमचा निकाल

उमेदवार indiapostgdsonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज स्थिती तपासू शकतात आणि गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकतात. भारतीय पोस्ट लवकरच ग्रामीण डाक सेवक (GDS) 2025 भरतीसाठी (GDS 2025 Recruitment) कागदपत्र पडताळणी  यादी जाहीर (Document verification list announced) करणार आहे. एकूण 21 हजार 413 पदांसाठी निवड प्रक्रिया होत असून इयत्ता 10 वी च्या गुणांवर आधारित निवड होईल.

पोस्ट ऑफिस GDS DV यादी जाहीर; असा तपासा तुमचा निकाल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मागील काही महिन्यांपासून भारतीय डाक भरतीकडे राज्यातील हजारो तरुण नजर लावून बसले आहेत. त्यानंतर या या भरती प्रक्रियेतील महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. भारतीय डाक विभागाने जीडीएस डीव्ही यादी जाहीर (India Post GDS DV list released) केली आहे. त्यानुसार उमेदवारांना आपल्या अर्जाची स्थिती तपासता येणार आहे. उमेदवार indiapostgdsonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज स्थिती तपासू शकतात आणि गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकतात. भारतीय पोस्ट लवकरच ग्रामीण डाक सेवक (GDS) 2025 भरतीसाठी (GDS 2025 Recruitment) कागदपत्र पडताळणी  यादी जाहीर (Document verification list announced) करणार आहे. एकूण 21 हजार 413 पदांसाठी निवड प्रक्रिया होत असून इयत्ता 10 वी च्या गुणांवर आधारित निवड होईल.

GDS निकाल असा तपासा

प्रथम भारतीय टपालाचे संकेतस्थळ indiapostgdsonline.gov.in ला भेट द्या. तिथे गेल्यावर GDS अर्ज स्थिती लिंक वर क्लिक करा. तुमचा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा. त्यानंतर तुम्हाला अर्ज स्थिती PDF स्वरूपात स्क्रीनवर दिसेल. समोर दिसणारी PDF डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढा.

अशी डाउनलोड करा गुणवत्ता यादी 

गुणवत्ता यादी डाउनलोड करण्यासाठी प्रथम भारतीय पोस्टाचे अधिकृत संकेतस्थळ indiapostgdsonline.gov.in ला भेट द्या. तिथे तुम्हाला समोर दिसणार्‍या गुणवत्ता यादी PDF लिंक वर क्लिक करा. आवश्यक लॉगिन क्रेडेन्शियल्स (अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख) प्रविष्ट करा. तिथे तुम्हाला GDS गुणवत्ता यादी 2025 PDF स्क्रीनवर दिसेल. स्क्रिनवर दिसणारी डाऊनलोड करून प्रिंट काढून घ्या.