CET Cell 2025 : एलएलबी ५ वर्षे प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र प्रसिद्ध
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षामार्फत एमएच सीईटी कायदा 5 वर्षांच्या एलएलबी प्रवेश परीक्षेसाठी प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षेत सहभागी होणारे उमेदवार सीईटी सेलचे अधिकृत संकेतस्थळ cetcell.mahacet.org वर जाऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Test Cell) मार्फत एमएच सीईटी कायदा (MH CET Law) 5 वर्षांच्या एलएलबी (LLB 5 Year) प्रवेश परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Hall ticket released) प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षेत सहभागी होणारे उमेदवार सीईटी सेलचे अधिकृत संकेतस्थळ cetcell.mahacet.org वर जाऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
सीईटी सेलने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, एलएलबी ५ वर्षे परीक्षेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांमधील विविध परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहे. ही परीक्षा २८ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. एमएएम-एलएल.बी. ५ वर्षांच्या सीईटी २०२५ परीक्षा अनेक सत्रांमध्ये ऑनलाइन घेतली जाणार आहे. तसेच उमेदवारांनी ओळखीचा पुरावा म्हणून आवश्यक कागदपत्रांसह आपल्याला देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन सीईची सेलकडून करण्यात आले आहे.
https://eduvarta.com/Education-Minister-big-announcement-on-the-issue-of-Hindi-power
असे डाउनलोड करा प्रवेशपत्र
सर्वप्रथम सीईटी सेलचे अधिकृत संकेतस्थळ cetcell.mahacet.org ला भेट द्या. त्यानंतर होमपेजवर उपलब्ध असलेल्या CET लॉगिन लिंकवर क्लिक करा. तुम्हाला एका नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल. तिथे तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड प्रविष्ट करा. हॉल तिकीट पाहण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी सबमिट या बटनावर क्लिक करा. सर्व तपशील काळजीपूर्वक तपासा आणि परीक्षेच्या दिवसासाठी हार्ड कॉपी प्रिंट करा.
परीक्षेच्या दिवशी आवश्यक कागदपत्रे
उमेदवारासोबत परीक्षा केंद्रावर जाताना एमएएच एलएलबी ५ वर्षांच्या सीईटी २०२५ प्रवेशपत्राची छापील प्रत असणे आवश्यक आहे. तसेच आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून वैध फोटो असलेले ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे. (जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी एक). शक्यतो हाॅल तिकिटवर अपलोड केलेला अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत ठेवावा, अशा सूचना देण्यात आल्या