UPSC कडून 'या' पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन उमेदवार ऑनलाइन फॉर्म भरू शकतात.
एज्युवार्ता न्युज नेटवर्क
लोकसेवा आयोगाने (UPSC) जिओ सायंटिस्टच्या (Jio scientist) पदांसाठीच्या भरतीची (recruitment) अधिसूचना प्रसिध्द केली आहे. उमेदवारांना येत्या 20 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल . प्रिलिम परीक्षा (prelims exams) 9 फेब्रुवारी 2025 रोजी आणि मुख्य परीक्षा (mains Exam) जून 2025 मध्ये घेतली जाणार आहे. UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन उमेदवार ऑनलाइन फॉर्म (online form) भरू शकतात.
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून भूवैज्ञानिक विज्ञान/प्राणीशास्त्र/भौतिकशास्त्र/रसायनशास्त्रात पदव्युत्तर असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.येत्या 1 जानेवारी 2025 रोजी उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे. नियमानुसार, वयात कमाल ७ वर्षांपर्यंत सूट दिली जाईल. ऑनलाइन परीक्षा,वैयक्तिक मुलाखत,कागदपत्रांची पडताळणी या निवड प्रक्रियेतून उमेदवारांची निवड केली जाईल.
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जावा.वन टाइम रजिस्ट्रेशन (ओटीआर) वर क्लिक करा.नाव, पदवी,ओळखपत्र, पासपोर्ट आकार फोटो यासारखी आवश्यक माहिती प्रविष्ट करा.सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर, पूर्वावलोकन' लिंकवर क्लिक करा.फी जमा केल्यानंतर, ऑनलाइन अर्ज 'सबमिट' बटणावर क्लिक करा.