ज्युनिअर वकिलांना 15 ते 20 हजार रुपये मानधन द्यावे; BCI ची शिफारस 

शहरी भागातून येणाऱ्या कनिष्ठ वकिलांना मासिक 20,000 रुपये, तर ग्रामीण भागातून येणाऱ्या कनिष्ठ वकिलांना 15,000 रुपये मासिक स्टायपेंड दिले जाईल. हे स्टायपेंड सामील झाल्याच्या तारखेपासून किमान तीन वर्षांसाठी दिले जावे जेणेकरून त्यांना आर्थिक घडी बसवण्यास मदत होईल.' मात्र, प्रत्येकासाठी मार्गदर्शक तत्त्वे बंधनकारक करता येणार नाहीत

ज्युनिअर वकिलांना 15 ते 20 हजार रुपये मानधन द्यावे; BCI ची शिफारस 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

बार कौन्सिल ऑफ इंडियाने (Bar Council of India) BCI कनिष्ठ वकिलांचे हित लक्षात घेऊन एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बीसीआयने कनिष्ठ वकिलांना दरमहा 15 ते 20 हजार रुपये मानधन देण्याची शिफारस केली आहे (15 to 20 thousand rupees stipend per month is recommended for junior lawyers) बीसीआयने म्हटले आहे की, 'सुरुवातीला वकिलांना विविध प्रकारच्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते अशा परिस्थितीत त्यांचे हित लक्षात घेऊन त्यांना काही मदत करणे आवश्यक आहे.'

बीसीआयने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, शहरी भागातून येणाऱ्या कनिष्ठ वकिलांना मासिक 20 हजार रुपये, तर ग्रामीण भागातून येणाऱ्या कनिष्ठ वकिलांना 15 हजार रुपये मासिक स्टायपेंड दिले जाईल. हे स्टायपेंड सामील झाल्याच्या तारखेपासून किमान तीन वर्षांसाठी दिले जावे जेणेकरून त्यांना आर्थिक घडी बसवण्यास मदत होईल.' मात्र, प्रत्येकासाठी मार्गदर्शक तत्त्वे बंधनकारक करता येणार नाहीत असे बीसीआयने म्हटले आहे.
तसेच बीसीआयने स्टायपेंड पेमेंट आणि नियुक्तीसाठीच्या अटींचे अचूक रेकॉर्ड ठेवण्याचे निर्देश दिले आहेत आणि राज्य बार कौन्सिलच्या वार्षिक अहवालात त्याचा समावेश करावा असेही म्हटले आहे. जर कोणत्याही कनिष्ठ वकिलांना निर्धारित स्टायपेंड मिळत नसेल तर ते संबंधित राज्य बार कौन्सिलकडे त्यांची तक्रार करू शकतात, असे ही बीसीआयने स्पष्ट केले आहे. 

बीसीआयकडून वरिष्ठ वकिलांनाही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. बीसीआयने म्हटले आहे की, 'वरिष्ठ वकील आणि कायदा संस्थांनी आर्थिक सहाय्य तसेच कनिष्ठ वकिलांना मार्गदर्शन करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे जेणेकरून ते लवकर पुढे जाऊ शकतील.'