'एमपीएससी'मार्फत ३२० पदांसाठी आजपासून अर्ज सुरू,  १० फेब्रुवारी अंतिम मुदत 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत  विविध पदांच्या  भरती अर्जासाठी सुरुवात आली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत १० फेब्रुवारी देण्यात आली आहे. भरती प्रक्रियेत सहभागी होणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार आयोगाचे अधिकृत https://mpsc.gov.in वर जाऊन उमेदवार अर्ज भरू शकतात. 

'एमपीएससी'मार्फत ३२० पदांसाठी आजपासून अर्ज सुरू,  १० फेब्रुवारी अंतिम मुदत 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC)  विविध पदांच्या  भरती अर्जासाठी सुरुवात करण्यात आली आहे. आयोगाकडून एकूण 320 रिक्त जागांसाठी ही भरती केली जात आहे. या भरती अंतर्गत सिव्हिल सर्जन आणि अन्य विविध ग्रुप A (Civil Surgeon Group A) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी आज २१ जानेवारीपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात (Application process begins) करण्यात आली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत १० फेब्रुवारी देण्यात आली आहे. भरती प्रक्रियेत सहभागी होणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार आयोगाचे अधिकृत https://mpsc.gov.in वर जाऊन उमेदवार अर्ज भरू शकतात. 

या भरती मोहिमेत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ  संवर्गांतील २२५ पदे भरण्यात येणार आहेत. तर त्याच विभागातील विविध विषयांतील विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ  संवर्गांतील एकूण ९५ पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. या भरतीअंतर्गत राखीव प्रवर्ग, खेळाडू, महिला आणि दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. 

भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांचे किमान वय हे १९ वर्षे तर कमाल वयोमर्यादा ३८ वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. भरती नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सुट देण्यात आली आहे. तसेच खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांना ७१९ रुपये तर मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल/अनाथ/अपंग प्रवर्गातील उमेदवारांना ४४९ रुपये अर्ज शुल्क भरावा लागणार आहे. अर्ज शुल्क ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही मोडमध्ये भरता येणार आहे.