कुलगुरूंची विद्यापीठाच्या वसतिगृहांना अचानक भेट

वसतिगृहांमधील समस्यांबाबत विद्यार्थी सातत्याने विद्यापीठ प्रशासनाकडे निवेदने देत आहेत. तसेच विविध विद्यार्थी संघटना आंदोलने करीत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी नुकतीच विद्यापीठाच्या वसतिगृहांना अचानक भेट दिली.

कुलगुरूंची  विद्यापीठाच्या वसतिगृहांना अचानक भेट

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) विविध वसतिगृहांमधील समस्यांबाबत विद्यार्थी सातत्याने विद्यापीठ प्रशासनाकडे निवेदने देत आहेत. तसेच विविध विद्यार्थी संघटना आंदोलने करीत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी (Vice Chancellor Dr. Suresh Gosavi) यांनी नुकतीच विद्यापीठाच्या वसतिगृहांना अचानक भेट (surprise visit to the hostels) दिली. तसेच विद्यापीठातील वसतीगृहामधील समस्यांचा आढावा घेतला. त्यामुळे पुढील काही महिन्यांमध्ये वस्तीगृहामध्ये अमुलाग्र बदल केले जाणार असल्याचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी स्पष्ट केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत वसतिगृहांची क्षमता अपुरी आहे.परिणामी विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वसतिगृह मिळत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी संघटनांकडून वसतीगृहाच्या मागणीसाठी आंदोलने केली जातात. त्यातच विद्यापीठ प्रशासनाने वसतिगृहात बाबत नवी नियमावली तयार केली आहे. त्यानुसार एकदा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला दुसऱ्यांदा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर वस्तीगृह दिले जाणार नाही. परंतु, विद्यार्थी संघटनांचा या नियमावलीला विरोध आहे. 

दरम्यान, विद्यापीठातील मुलींच्या वसतीगृहाची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहे. खासदार निधीतून नवीन वसतीगृह उभारणीचे काम सुरू झाले आहे. मुलांसाठी सुद्धा नवीन वसतीगृह बांधण्याबाबत चाचपणी केली जात आहे. या पुढील काळात वसतिगृहाच्या सुरक्षिततेबाबत तसेच सोयी सुविधांबाबत विशेष लक्ष दिले जाणार आहे. 
-------
विद्यापीठ आवारातील वस्तीगृहांमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात. तसेच अधिकाधिक विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध व्हावे, या दृष्टीने विद्यापीठ प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. विद्यापीठातील वसतीगृहामधील सुविधांची तपासणी करण्यासाठी अचानक भेट दिली असता त्यात काही बाबी आढळून आल्या आहेत. लवकरच त्यात सुधारणा केल्या जातील.
 - डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे