UGC NET 2023 : यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १३ ते १७ जूनदरम्यान आयोजन

परीक्षेसाठीची नोंदणी बंद झाली असून विद्यार्थ्यांना आता लवकरच त्यांच्या परीक्षा केंद्राबाबतची माहिती उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे एनटीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

UGC NET 2023 : यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १३ ते १७ जूनदरम्यान आयोजन
UGC NET 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता चाचणी (UGC NET 2023) चे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) ही परीक्षा १३ ते १७ जून या कालावधीत घेतली जाईल. देशभरात ८३ विषयांसाठी संगणक-आधारित चाचणी (CBT) पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे.

परीक्षेसाठीची नोंदणी बंद झाली असून विद्यार्थ्यांना आता लवकरच त्यांच्या परीक्षा केंद्राबाबतची माहिती उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे एनटीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. देशभरातील महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांमध्ये सहायक प्राध्यापक आणि ज्यूनिअर रिसर्च फेलोशिपसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. त्यामुळे देशभरातील लाखो विद्यार्थी हे परीक्षा देतात.

Anti Corruption : पाच महिन्यांत शिक्षण विभागातील २१ जण सापळ्यात; आरोपींच्या नावांसह सविस्तर माहिती वाचा

एनटीएने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसा, वाणिज्य, शारीरिक शिक्षण, वाणिज्य, ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयांची परीक्षा १३ जून रोजी होईल. इंग्रजी, गृहविज्ञान व संस्कृत विषयांची १४ जून रोजी तर राज्यशास्त्र, मानसशास्त्र, पर्यावरण विज्ञान या विषयांची परीक्षा १५ जून रोजी होणार आहे.

इतिहास, व्यवस्थापन (व्यवसाय प्रशासन/ मार्केटिंग/ मार्केटिंग एमजीटी/ औद्योगिक संबंध आणि सहकारी  व्यवस्थापन), कायदा या विषयांसाठी १६ जून तर संगणक विज्ञान आणि अनुप्रयोग, हिंदी आणि समाजशास्त्र या विषयांसाठी १७ जून रोजी परीक्षा घेण्याचे नियोजित आहे. परीक्षेविषयी अधिक माहितीसाठी ugcnet.nta.nic.in या संकेतस्थळावर जाऊन अद्ययावत माहिती घ्यावी.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo