ऑल इंडिया बार परीक्षेसाठी नोंदणी सुरू, 24 नोव्हेंबर रोजी परीक्षा 

AIBE च्या अधिकृत वेबसाइट allindiabarexamination.com  ला भेट देऊन उमेदवार ऑनलाइन अर्ज भरू शकतात. ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर आणि फी भरण्याची अंतिम तारीख 28 ऑक्टोबर 2024 निश्चित करण्यात आली आहे.

ऑल इंडिया बार परीक्षेसाठी नोंदणी सुरू, 24 नोव्हेंबर रोजी परीक्षा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

ऑल इंडिया बार एक्झामिनेशन (All India Bar Examination) XIX  ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) द्वारे ऑल इंडिया बार एक्झामिनेशन 19 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू (Start the registration process) करण्यात आली आहे. AIBE च्या allindiabarexamination.com  या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार ऑनलाइन अर्ज भरू शकतात. ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर (Last date for filling the form is 25th October) आणि फी भरण्याची अंतिम तारीख 28 ऑक्टोबर 2024 निश्चित करण्यात आली आहे.

AIBE - 19 मध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार बार कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या विद्यापीठातून कायद्याचा पदवीधर (3 वर्ष LLB/ 5-वर्ष LLB) असणे आवश्यक आहे. यामध्ये टक्केवारीची देखील अट ठेवण्यात आलेली आहे. त्यानुसार जनरल, OBC उमेदवार  45% तर SC/ST उमेदवार 40%  घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. 

AIBE 19 परीक्षा 2024 मध्ये 100 वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील. AIBE 19 च्या अभ्यासक्रमात घटनात्मक कायदा, प्रशासकीय कायदा, IPC, CrPC, न्यायशास्त्र, IPR कायदा, कौटुंबिक कायदा यासारख्या विषयांचा समावेश असेल. AIBE 19 (XIX) अर्ज भरण्याची शेवटची तारीख ऑक्टोबर 25, 2024 आहे. बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) ने अधिकृत AIBE 19 अधिसूचनेसह AIBE (XIX) 19 च्या परीक्षेची तारीख जाहीर केली . 14 नोव्हेंबर रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. किमान आवश्यकतेनुसार परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कायद्याच्या कोर्टात त्यांचा सराव सुरू ठेवण्यासाठी 'सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस' प्रसिद्ध केले जाते.