MH CET 2025 : 'या' अभ्यासक्रमाच्या नोंदणीसाठी अंतिम तारीख वाढली

उमेदवार आता अधिकृत वेबसाइटला https://cetcell.mahacet.org/ भेट देऊन २८ मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. यापूर्वी, नोंदणी करण्याची शेवटची तारीख २० मार्च होती.

MH CET 2025 : 'या' अभ्यासक्रमाच्या नोंदणीसाठी अंतिम तारीख वाढली

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (MH CET 2025) सेलने विविध अभ्यासक्रमासाठी एमएएच सीईटी २०२५ साठी नोंदणीची अंतिम (Registration Date) तारीख वाढवली आहे. उमेदवार आता अधिकृत वेबसाइटला https://cetcell.mahacet.org/ भेट देऊन २८ मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. यापूर्वी, नोंदणी करण्याची शेवटची तारीख २० मार्च होती.

एकात्मिक मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (MBA), मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स (MCA), बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स (BCA), बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (BBM) आणि बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (BMS) अभ्यासक्रमांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा (MH CET) २०२५ साठी नोंदणीची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे.  

‘या’ परीक्षेसाठी असा करा अर्ज

  * https://cetcell.mahacet.org/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

* त्यानंतर MAH CET 2025 नोंदणी लिंकवर क्लिक करा.

*नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा आणि लॉगिन क्रेडेन्शियल्स जनरेट करा. *

पोर्टलने दिलेल्या मार्गदर्शनानुसार आवश्यक तपशीलांसह अर्ज फॉर्म भरा.

* फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रत डाउनलोड करा.

लॉजिकल रिझनिंग, अ‍ॅब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूड आणि व्हर्बल एबिलिटी अँड रीडिंग कॉम्प्रिहेंशन अशी चार विभागांमध्ये ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे.