राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये ५४ टक्के जागा रिक्त, भरती अभावी शिक्षणाचा दर्जा घसरला.. 

राहुरी, परभणी, दापोली, आणि अकोला येथील कृषी विद्यापीठांमध्ये १२ हजार ४८२ मंजूर पदांपैकी ६ हजार ७९१ पदे सध्या रिक्त जागांच्या भरतीसाठी हजारो तरूण आस लावून बसले आहेत. 

राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये ५४ टक्के जागा रिक्त, भरती अभावी शिक्षणाचा दर्जा घसरला.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सध्या राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये (Agricultural University) सुमारे साडेबारा हजार मंजूर पदांपैकी जवळपास ५४ टक्के पदे रिक्त (54% posts are vacant) आहेत. त्यामुळे विद्यापीठातील शिक्षणासह संशोधनाचा दर्जा घसरला (Education and research standards have declined) असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे राहुरी, परभणी, दापोली, आणि अकोला येथील कृषी विद्यापीठांमध्ये १२ हजार ४८२ मंजूर पदांपैकी ६ हजार ७९१ पदे सध्या रिक्त जागांच्या भरतीसाठी हजारो तरूण आस लावून बसले आहेत. 

या चारही विद्यापीठात बऱ्याच वर्षांपासून पदभरती प्रक्रिया थांबली आहे आणि अनुभवी शास्त्रज्ञ निवृत्त होत असल्याने विद्यापीठांमधील संशोधनाची गती कमी झाली आहे. अनेक विभागात रिक्त पदे असल्यांचे चित्र आहे. राज्य सरकारच्या या निष्क्रियतेमुळे शेतकरी आणि कृषी पदवीधरांमध्ये नाराजी आहे, आणि त्यामुळे कृषी अभ्यासक्रमांकडे वळण्याचा विद्यार्थ्यांचा कल कमी होताना दिसत आहे.

विद्यापीठातील रिक्त पदांमध्ये अ, ब, क, आणि ड या श्रेणीतील विविध पदांचा समावेश आहे. विशेषत: गट अ मध्ये ४८.२३%, गट ब मध्ये ४१.८०%, गट क मध्ये ४१.४७%, आणि गट ड मध्ये ६२.६८% पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमध्ये सहायक प्राध्यापक, वरिष्ठ संशोधन सहायक, कनिष्ठ संशोधन सहायक, आणि कृषी सहायक या पदांचा समावेश आहे. एकूण १ हजार ५१५ पदे सध्या रिक्त आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्कने देशातील सर्वोत्तम ४० कृषी विद्यापीठांची यादी जाहीर केली, पण त्यात राज्यातील एकही विद्यापीठ नाही. यावरून राज्यातील कृषी विद्यापीठांची स्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते.