पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पदभरती, जाहिरातीसंदर्भात महत्त्वाची अपडेट

परीक्षा परिषदेकडून शिक्षण आयुक्तालयामार्फत अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी (TAIT) आयोजित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे.

पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पदभरती, जाहिरातीसंदर्भात महत्त्वाची अपडेट

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षक भरतीच्या तयारीत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक भरती (Pavitra Portal Teacher Recruitment) राबवण्यात येत आहे. त्यातील जाहिराती संदर्भात मोठी अपडेट (Big update regarding advertisements) समोर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेने (State Examination Council) शिक्षण आयुक्तालयामार्फत अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी (TAIT) आयोजित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे. त्यामुळे उमेदवारांना परीक्षेच्या तयारीला लागावे लागणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेसाठी (Second phase teacher recruitment) किती जागा उपलब्ध होणार याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांकडून (Local Government and Private Educational Management Schools) शिक्षकांच्या पदभरतीबाबत पोर्टलवर जाहिराती अल्प प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीमध्ये मोठी स्पर्धा पहिला मिळणार आहे. 

राज्यात शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असताना आता पुन्हा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी (टेट) घेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला देण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांसाठीची भरती प्रक्रिया पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत आहे.त्यानुसार पवित्र संकेतस्थळावर जाहिराती नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दुसऱ्या टप्प्यातील भरती येत्या काही महिन्यांत पूर्ण करून नव्या शैक्षणिक वर्षांत शाळांमध्ये नवे शिक्षक उपलब्ध करण्याचा  शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. पवित्र संकेतस्थळामार्फत होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीतील (टेट) पात्रता आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेकडून शिक्षण आयुक्तालयामार्फत अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आयोजित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. 

शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक २० जानेवारीपासून पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली आहे. शिक्षण आयुक्तांनी पद भरतीसंदर्भात आढावा घेतला आहे. मात्र, अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांकडून शिक्षकांच्या पदभरतीबाबत पोर्टलवर जाहिराती अल्प प्रमाणात प्राप्त झाल्या असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आयुक्तांकडून राज्यातील सर्वच शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात आले आहे. आपल्या अधिनस्त शाळातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी. पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी mahateacherrecruitment.org.in संकेतस्थळावर भेट द्यावी. या सदर जाहिरातीसाठी पवित्र पोर्टलवर दिनांक २० फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.