रेल्वेत १० हजार पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
भारतीय रेल्वेने मध्ये असिस्टंट लोको पायलट पदासाठी 9950 पदांसाठी नवीन भरती करण्यासाठी मान्यता दिली आहे . ही भरती देशभरातील विविध रेल्वे विभागांमध्ये केली जाईल. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच जाहीर केली जाईल.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
भारतीय रेल्वेने (Railway Recruitment) देशभरात जवळपास 10 हजार लोगो पायलट पदांच्या (Logo Pilot 10 thousand posts) भरतीसाठी नुकतीस जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भारतीय रेल्वेने मध्ये असिस्टंट लोको पायलट (ALP) पदासाठी 9 हजार 950 पदांसाठी नवीन भरती करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे . ही भरती देशभरातील विविध रेल्वे विभागांमध्ये केली जाईल. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया (Online application process) लवकरच जाहीर केली जाईल.
या भरतीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराने 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराने मान्यताप्राप्त आयटीआयमधून इलेक्ट्रिशियन, मेकेनिकल, सिव्हिल किंवा इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडमध्ये डिप्लोमा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराची वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयामध्ये सवलत देण्यात येईल. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागेल. तर, SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांना 250 रुपये शुल्क भरावे लागेल.
रेल्वे मंत्रालयाच्या पुढाकाराने सहाय्यक लोको पायलट पदाच्या नवीन भरतीची अधिसूचना तरुणांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. जे उमेदवारा रेल्वेमध्ये भरती प्रक्रिया सुरू होण्याची वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी समजली जाते.
महाकुंभमेळ्यादरम्यान, ईशान्य रेल्वेने नियमित गाड्यांव्यतिरिक्त सुमारे १७०० विशेष गाड्या चालवल्या होत्या. गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाल्यामुळे लोको पायलटना पुरेशी विश्रांती मिळत नाही. प्रत्येक क्षणी सुरक्षिततेवर परिणाम होण्याचा धोका असतो. त्यामुळे ही मोठ्या पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.