150 रुपयात चार्जर बनवणाऱ्या १५ वर्षांच्या 'उत्कर्ष'ची थेट नासापर्यंत झेप
जिल्हाधिकारी मनीष कुमार वर्मा यांनी उत्कर्ष च्या कामाने प्रभावित होऊन त्याची शिफारिश करून त्याला रोव्हर बनवणाऱ्या टीमचा भाग बनवले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
एका विज्ञान स्पर्धेत भाग घेण्यासाठी १५ वर्षांच्या 'उत्कर्ष'ने वयारलेस इलेक्ट्रिक वाहन चार्जर(Wireless Electric Vehicle Charger) बनवले. ते चार्जर इतके प्रभावी ठरले की, आता उत्कर्षची निवड नासामधील मानवी शोध रोव्हर चॅलेंजसाठी (Human Discovery Rover Challenge at NASA)करण्यात आली आहे. उत्कर्ष लवकरच टीमसोबत नासाला जाणार आहे.
उत्कर्ष हा सध्या उत्तर प्रदेश बोर्डातून दहावीची परीक्षा देत आहे. (Utkarsh is giving 10th exam from Uttar Pradesh board)उत्कर्षने जानेवारीमध्ये एका विज्ञान स्पर्धेत भाग घेतला होता. ज्यामध्ये त्याने वायरलेस इलेक्ट्रिक वाहन चार्जर बनवले होते. या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे असलेले जिल्हाधिकारी मनीष कुमार वर्मा यांनी उत्कर्ष च्या कामाने प्रभावित होऊन त्याची शिफारिश करून त्याला रोव्हर बनवणाऱ्या टीमचा भाग बनवले आहे. हे रोव्हर नासामधील मानवी शोध रोव्हर चॅलेंजमध्ये भाग घेणार आहे. उत्कर्ष लवकरच आपल्या टीमसोबत नासाला जाणार आहे.
उत्कर्षचे आयुष्य संघर्षाने भरलेले आहे.उत्कर्ष फक्त 15 वर्षांचा आहे. आठ वर्षांपूर्वी त्यांचे वडील उपेंद्र यांना ब्रेन हॅमरेज झाला होता. उत्कर्षचे आजोबा सुरेंद्र सिंह शेतीतून घरखर्च भागवतात. उत्कर्ष आजोबांना शेतीतही पूर्ण मदत करतो. विशेष म्हणजे उत्कर्ष सरकारी शाळेचा विद्यार्थी आहे. उत्कर्षला भविष्यात डिझायनिंग इंजिनिअर व्हायचे आहे.