यूजीसी नेट जून सत्रासाठी ऑनलाइन अर्ज सुरू

UGC NET परीक्षेला बसण्यासाठी, उमेदवाराने संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी किंवा तो अंतिम वर्षात शिकत असावा. ४ वर्षांची पदवी घेतलेले उमेदवार देखील या परीक्षेला बसण्यास पात्र आहेत. याशिवाय, JRF साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय 31 वर्षांपेक्षा जास्त नसावे. NET साठी कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही.

यूजीसी नेट जून सत्रासाठी ऑनलाइन अर्ज सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 


जून २०२५ च्या यूजीसी नेट सत्राची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) एनटीए ने जून २०२५ मध्ये होणाऱ्या यूजीसी नेटसाठी (UGC NET session of June 2025) अधिसूचना जारी करून १६ एप्रिलपासून अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. (Application process starts from April 16) नोंदणीची शेवटची तारीख ७ मे २०२५ निश्चित करण्यात आली आहे. या परीक्षेत सहभागी होण्यासाठी, विद्यार्थी NTA च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in ला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरू शकतात.

यूजीसी नेट जून सत्राचे वेळापत्रक

* ऑनलाइन नोंदणी सुरू होण्याची तारीख १६ एप्रिल २०२५
* अर्ज भरण्याची शेवटची तारीख ७ मे २०२५ 
* अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख ८ मे २०२५
* फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्याची तारीख ९ ते १० मे २०२५ 
* यूजीसी नेट जून २०२५ परीक्षेची तारीख २१ ते ३० जून २०२५

UGC NET परीक्षेला बसण्यासाठी, उमेदवाराने संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी किंवा तो अंतिम वर्षात शिकत असावा. ४ वर्षांची पदवी घेतलेले उमेदवार देखील या परीक्षेला बसण्यास पात्र आहेत. याशिवाय, JRF साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय 31 वर्षांपेक्षा जास्त नसावे. NET साठी कोणतीही उच्च वयोमर्यादा नाही.

अर्ज कसा भरावा?

* UGC NET अर्ज भरण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in ला भेट द्या.
* वेबसाइटच्या होम पेजवर, तुम्हाला UGC NET जून २०२५ वर क्लिक करावे लागेल
* आता नवीन पेजवर, 'New Candidate Register Here' लिंकवर क्लिक करा आणि आवश्यक तपशील भरून नोंदणी करा.
* नोंदणीनंतर, उमेदवारांनी फॉर्मशी संबंधित इतर तपशील भरावेत.
* त्यानंतर उमेदवारांनी त्यांचे छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करावी.
* आता शेवटी विहित शुल्क जमा करा आणि फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या आणि ती सुरक्षित ठेवा.