UGC NET 'Answer Key' 2024 प्रसिद्ध, ९ सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवा
UGC NET जून 2024 च्या परीक्षेला बसलेले उमेदवार NTA च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in वरून UGC NET Answer Key 2024 डाउनलोड करू शकतात. त्यानंतर उमेदवारांना ९ सप्टेंबरपर्यंत उत्तर की वर आक्षेप नोंदवता येणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) युजीसी नेट अन्सर की UGC NET Answer Key 2024 प्रसिद्ध केली आहे. UGC NET जून 2024 च्या परीक्षेला बसलेले उमेदवार NTA च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in वरून UGC NET Answer Key 2024 डाउनलोड करू शकतात. त्यानंतर उमेदवारांना ९ सप्टेंबरपर्यंत उत्तर की वर आक्षेप नोंदवता (File objections by September 9) येणार आहे.
NTA UGC NET परीक्षा 21 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2024 या कालावधीत घेण्यात आली होती. पुरामुळे विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा रद्द करून काही दिवसांतच पुन्हा परीक्षा घेण्यात आली. UGC NET 2024 उत्तर की डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
अशी डाऊनलोड करा UGC NET 2024 ची उत्तर की -
UGC NET 2024 ची उत्तर की पाहाण्यासाठी सर्व प्रथम UGC NET ugcnet.nta.ac.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा. आता होमपेजवर जा आणि UGC NET Answer Key 2024 च्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकून सबमिट करा. संगणकाच्या स्क्रीनवर तुम्हाला तुमची उत्तर की दिसेल. ती डाउनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी सेव्ह करा.