विद्यापीठातील चंदन चोरांना पळता भुई झाली थोडी.... 

शुक्रवारी रात्री पुन्हा चोरट्यांनी बोटॅनिकल गार्डन मधील चंदनाचे झाड चोरण्याचा प्रयत्न केला.मात्र,या परिसरात गस्त घालणाऱ्या सुरक्षा रक्षकाने चरट्यांची हालचाल पाहिली.

विद्यापीठातील चंदन चोरांना पळता भुई झाली थोडी.... 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या भुरट्या चोरांना विद्यापीठातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी (University Security Guard) शुक्रवारी रात्रीपळता भुई थोडी केली. चांदनाचे झाड चोरण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी  विद्यापीठातील सुरक्षा कर्मचारी सर्व बाजूंनी आपल्या पकडण्यासाठी आलेले पाहून चंदन चोरट्यांनी  (Sandalwood thieves) आपले सर्व साहित्य टाकून विद्यापीठातून पळ काढला.चंदन चोरणारे टोळी गेल्या काही वर्षापासून या परिसरात सक्रिय आहे.परंतु, सुरक्षा विभागाने गस्त अधिक वाढवल्यामुळे भुरटे चोर आता पकडले जाऊ शकतात.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात घनदाट झाडे असल्यामुळे अनेक ठिकाणी चंदनाची झाडे आहेत.त्यातील अनेक झाडे चोरट्यांनी तोडली आहेत. आठवड्या भरापूर्वी बोटॅनिकल गार्डन आणि ललित कला केंद्रातील चंदनाच्या झाडाची चोरी झाल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे भुरटे चोर विद्यापीठात धूमाकूळ घालत असल्याचे चित्र निर्माण झाले होते.मात्र,शुक्रवारी रात्री पुन्हा चोरट्यांनी बोटॅनिकल गार्डन मधील चंदनाचे झाड चोरण्याचा प्रयत्न केला.मात्र,या परिसरात गस्त घालणाऱ्या सुरक्षा रक्षकाने चरट्यांची हालचाल पाहिली.त्याने चोरट्यांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला.मात्र,चोरट्यांनी गुलेलीने  (गिलवरी) सुरक्षा रक्षकावर दगड भरकवले.त्यामुळे त्याने विद्यापीठाच्या सुरक्षा विभागात मोबाईलवरून याबबात कल्पना दिली.सुरक्षा परिवेक्षक भारत ठुबे यांनी तात्काळ परिसरातील सर्व रक्षकांना बोटॅनिकल गार्डन येथे जाण्यास सांगितले. 

ठुबे यांनी दिलेल्या सुचनेनंतर सर्व सुरक्षा रक्षक येथे जमा झाले.त्यांनी टॉर्चच्या प्रकाशात चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न सुरू केला.मात्र,अनेक सुरक्षा रक्षक आल्याचे पाहून चोरट्यांनी तेथून पळ काढला.चोरटे  दोन मोठ्या करवत, एक लहान करवत, कुऱ्हाड, दोरी ,हेल्मेट, दोन जॉकेट,गलुल ,गलुलने मारण्यासाठी गोल आकाराचे दगड  बिस्किटचे पुडे, अननस आदी साहित्य बोटॅनिकल गार्डन येथे टाकून पळून गेले.त्यानंतर पोलिसांना बोलवून सुरक्षा विभागाने सर्व साहित्य त्यांच्या ताब्यात दिले.संदीप सावंत,भारत ठुबे ,आबा ठुबे यांच्यासह इतर सुरक्षा अधिकारी व कर्मचारी यांनी ही कामगिरी केली. 
---------------------