सुशांत रामनाथ मोकळ यांना पीएच.डी. जाहीर

"अ स्टडी ऑफ प्रॉब्लेम्स अँड प्रॉस्पेक्ट्स ऑफ इ-फाईलिंग सिस्टम अंडर इनकम टॅक्स विथ रिस्पेक्ट टू सॅलरीड इम्प्लॉयी इन द हायर एज्युकेशन इंस्टिट्युशन्स" या विषयात पीएच. डी. पदवी प्राप्त केली आहे.

सुशांत रामनाथ मोकळ यांना पीएच.डी. जाहीर

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सुशांत रामनाथ मोकळ (Sushant Mokal)यांना पीएच.डी.(Ph.D)जाहीर झाली आहे. मोकळ हे ओतूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महावि‌द्यालयातील वाणिज्य विभागातील संशोधक वि‌द्यार्थी आहेत.मोकळ यांना  "अ स्टडी ऑफ प्रॉब्लेम्स अँड प्रॉस्पेक्ट्स ऑफ इ-फाईलिंग सिस्टम अंडर इनकम टॅक्स विथ रिस्पेक्ट टू सॅलरीड इम्प्लॉयी इन द हायर एज्युकेशन इंस्टिट्युशन्स" या विषयात पीएच. डी. पदवी प्राप्त केली आहे. त्यांना प्रा. डॉ. खंदारे मुकिंदा बळीराम यांनी मार्गदर्शन केले. 

पीएच. डी. मौखिक परीक्षेसाठी बाह्य परीक्षक म्हणून प्रा. डॉ. गोविंद पी. शिंदे (मुंबई विद्‌यापीठ) व अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. रुपेश बनसोडे यांनी काम पाहिले. त्यांच्या या यशाब‌द्दल प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे, प्रा. डॉ. जी. एम. डुंबरे, (माजी वाणिज्य विभागप्रमुख), डॉ. सुनील लंगडे (वाणिज्य विभागप्रमुख), प्रा. डॉ. जे. पी. भोसले (संशोधन केंद्र प्रमुख, नारायणगांव कॉलेज), प्रा. डॉ. एस. डी. टाकळकर (वाणिज्य विभागप्रमुख, नारायणगांव कॉलेज) व पुणे जिल्हा शिक्षण मंडळातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांनी त्यांचे अभिनंदन केले. प्रा. सुशांत मोकळ हे सध्या एस.एम. जोशी कॉलेज येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर काकडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. एकनाथ मुंडे, महाविद्यालयातील प्राध्यापक, इतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.