PMC अंतर्गत १० वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज सुरू; ३० सप्टेंबरपर्यंत मुदत..

चांगल्या गुणाने पास झालेल्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ dbt.pmc.gov.in वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी दुपारी ५:30 पर्यंत देण्यात आली आहे.

PMC अंतर्गत १० वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज सुरू; ३० सप्टेंबरपर्यंत मुदत..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation Scholarship) दहावी आणि बारावीची परीक्षा चांगल्या गुणांसह उत्तीर्ण (Scholarship for 10th and 12th best marks students) झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी गुरूवार दि. ८ ऑगस्ट रोजी अर्ज भरण्यास सुरूवात (Start filling the application form) झाली आहे. चांगल्या गुणाने उतीर्ण झालेल्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://dbt.pmc.gov.in/app/index.html#!/  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी दुपारी ५:30 पर्यंत देण्यात आली आहे. महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून या संदर्भात माहिती (Social Development Department Information) देण्यात आली आहे. 
 
महापालिकेच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना https://dbt.pmc.gov.in/app/index.html#!/ या संकेतस्थळावर ३० सप्टेंबर रोजी दुपारी साडेपाचपर्यंत अर्ज करावा लागेल. यासाठी पात्र ठरलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना १५ हजार, तर बारावीच्या विद्यार्थ्यांना २५ हजार रुपयांचे अर्थसाह्य महापालिकेकडून देण्यात येते. महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या दहावी व बारावीमध्ये ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या खुल्या गटातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मौलाना अबुल कलाम आझाद योजनेंतर्गत अर्थसाह्य केले जाते. 

पुणे महापालिकेच्या शाळेतील ७० टक्के गुण मिळवलेले मागासवर्गीय विद्यार्थी, ४० टक्के अपंगत्व असलेल्या व ६५ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थी यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे योजनेंतर्गत इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अर्थसाह्य दिले जाते. यासाठी राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे. दहावी, बारावीनंतर शासनमान्य संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती मिळेल.