प्रियदर्शनी स्कूलमध्ये युवा संवाद; विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार महत्त्वाचे दाखले

भोसरी येथील इंद्रायणी नगर परिसरातील प्रियदर्शनी स्कूलमध्ये युवा संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखले वितरण बाबत आवश्यक माहिती देण्यात आली.

प्रियदर्शनी स्कूलमध्ये युवा संवाद; विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार महत्त्वाचे दाखले

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना (Students after passing 10th)पुढील शिक्षणासाठी विविध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता भासते. त्यावेळी विद्यार्थी व पालकांची दाखले जमा (certificate) करण्यासाठी धावपळ सुरू होते. परंतु, इयत्ता दहावी उत्तीर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले देण्याबाबत राज्य शासन व शाळा स्तरावर संयुक्तपणे उपक्रम राबविला जात आहे. भोसरी येथील इंद्रायणी नगर (Indrayani Nagar in Bhosari)परिसरातील प्रियदर्शनी स्कूलमधील (Priyadarshani School) विद्यार्थ्यांसाठी गुरूवारी (दि.8 ऑगस्ट) आयोजित कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्र उपलब्ध करून देण्याबाबत युवा संवाद कार्यक्रमाच्या (Youth Dialogue Programme)निमित्ताने मार्गदर्शन करण्यात आले. त्यास विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

राज्य शासनाच्या महसूल व वन विभागातर्फे 'महसूल सप्ताह' साजरा केला जात असून त्यानिमित्ताने विविध शाळांमध्ये युवा संवादाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. भोसरी येथील इंद्रायणी नगर परिसरातील प्रियदर्शनी स्कूलमध्ये युवा संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखले वितरण बाबत आवश्यक माहिती देण्यात आली. यावेळी भोसरीचे मंडल अधिकारी बाबा साळुंके, निगडीचे मंडल अधिकारी वैभव भुतेकर,  चिंचवड येथील मंडल अधिकारी सुरेंद्र जाधव, देहू येथील मंडल अधिकारी दिनेश नरवडे, भोसरीच्या तलाठी पुनम शिंदे ,वर्षा लांडे ,सुरेश डावरे ,अतुल गीते आदी उपस्थित होते. प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलचे विश्वस्त डॉ. राजेंद्र सिंग यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. प्रियदर्शनी सीबीएसई स्कूलच्या प्राचार्या गायत्री जाधव व एसएससी बोर्ड शाळेच्या प्राचार्या अर्पिता दीक्षित आदी उपस्थित होते. तसेच नागरी सुविधा केंद्राचे सर्व चालक यांनी या कार्यक्रमास हजरी लावली.  

राज्य शासनातर्फे 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून त्यामध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जात आहे. त्यातील युवा संवाद या कार्यक्रमांतर्गत भोसरीचे मंडल अधिकारी बाबा साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध प्रकारच्या दाखल्यांच्या वितरणाची माहिती दिली. साळुंके म्हणाले, विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, डोमासाईल प्रमाणपत्र आदी कागदपत्रांची आवश्यकता भासते. त्यासाठी शासनाकडून युवा संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळेतच विद्यार्थ्यांना दाखले देण्याबाबत उपक्रम राबविला जात आहे. शाळेत वितरित करण्यात आलेले अर्ज विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडून भरून शाळेत जमा करावेत,असे आवाहन केले. शाळेने युवासंवाद कार्यक्रमाच्या आयोजनासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. 

दरम्यान, प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलचे विश्वस्त डॉ. राजेंद्र सिंग, नरेंद्र सिंग यांच्यासह सर्व विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. शाळेत विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले दाखले मिळवण्यासाठी त्यांनी कोणती कागदपत्र जमा करावीत. यांचे फलक लावण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या गायत्री जाधव यांनी केले तर प्राचार्या अर्पिता दीक्षित यांनी उपस्थितांचे आभार मानले.