SBI तब्बल 10 हजार नवीन लोकांना घेणार कामावर

बँक ही नवीन भरती सामान्य बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी आणि तांत्रिक क्षमतेला चालना देण्यासाठी अधिक मनुष्यबळ निर्माण करणार आहे.

SBI तब्बल 10 हजार नवीन लोकांना घेणार कामावर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) SBI चालू आर्थिक वर्षात (In the current financial year) (2024-25) 10,000 नवीन कर्मचाऱ्यांची भरती (Recruitment of new employees) करणार आहे. बँक ही नवीन भरती सामान्य बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी आणि तांत्रिक क्षमतेला चालना देण्यासाठी अधिक मनुष्यबळ निर्माण करणार आहे. एसबीआयचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी (SBI Chairman C. S. Shetty) यांनी ही महिती दिली आहे. 

शेट्टी म्हणाले की, "आम्ही तंत्रज्ञान आणि सामान्य बँकिंग क्षेत्रासाठी आमच्या कर्मचार्‍यांची संख्या वाढवत आहोत. आम्ही अलीकडेच तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत सुमारे 1 हजार 500 लोकांना एंट्री लेव्हल आणि इतर पदांवर नियुक्त करण्याची घोषणा केली आहे. डेटा सायंटिस्ट, डेटा आर्किटेक्ट्स, नेटवर्क ऑपरेटर या विभागांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ नेमण्यात येणार आहे. एकूणच, आमची चालू वर्षाची गरज सुमारे 8 हजार  ते 10 हजार कर्मचार्‍यांची असेल."

शेट्टी म्हणाले की, ही एक सततची  प्रक्रिया आहे. ग्राहकांच्या विकसित गरजा पूर्ण करण्यासाठी बँक विद्यमान कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण देईल. ग्राहकांच्या अपेक्षा बदलत आहेत, तंत्रज्ञान बदलत आहे, डिजिटलायझेशनचा मोठ्या प्रमाणावर अवलंब होत आहे. म्हणूनच आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना सर्व स्तरांवर सतत नवीन कौशल्ये देणार आहोत.