सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी सातिश वाघमारे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी सातिश वाघमारे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कर्मचारी संघाच्या अध्यक्षपदी सातिश भगवान वाघमारे यांची गुरूवारी एकमताने निवड करण्यात आली. कर्मचारी संघाच्या कार्यकारिणीच्या सभेमध्ये निवडीचा निर्णय घेण्यात आला. कर्मचारी संघाचे माजी अध्यक्ष डॉ. सुनील धिवार यांचा कार्यकाल संपल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे. 

सातिश वाघमारे हे सन २००३ पासून कर्मचारी संघांमध्ये कार्यरत असून, मागील २२ वर्षात त्यांनी संघटनेची अनेक पदे भूषवली आहेत. त्यांची गुरूवारी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी डॉ. सुनील धिवार, संतोष मदने, भारत येडे , बसवंत गजलवार, एकनाथ गभाले, दयानंद माने, सत्येनंद्र मोरे, मंगेश कुडवे, सचिन पुठ्ठेवाड तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न वाघमारे यांनी सोडवावेत.तसेच कर्मचाऱ्यांचे हक्क आणि अधिकार आबाधित ठेवण्यासाठी त्यांनी पुढील काळात प्रयत्न करावेत,अशी अपेक्षा कर्मचारी संघाच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे.