JEE च्या विद्यार्थ्यांना आता तीन वेळा देता येणार परीक्षा

वर्ष 2025 मध्ये, IIT कानपूर द्वारे JEE Advanced परीक्षा आयोजित केली जाणार आहे. परीक्षेसाठी https://jeeadv.ac.in/index.html ही अधिकृत वेबसाइट जारी करण्यात आली आहे. भारतीय आणि परदेशी नागरिकांसाठी परीक्षेसाठी पात्रता निकषांसह अधिकृत पोर्टलवर इतर महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

JEE च्या विद्यार्थ्यांना आता तीन वेळा देता येणार परीक्षा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

JEE Advanced परीक्षेसाठी प्रयत्न करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. JEE Advanced च्या अधिकृत पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना जेईई ॲडव्हान्स परीक्षेत बसण्यासाठी तीन वेळा संधी देण्यात येणार आहे.  (Students will be given three attempt to appear in the JEE Advanced exam) याआधी विद्यार्थ्यांना या परीक्षसाठी दोन वेळा संधी देण्यात येत होती.
वर्ष 2025 मध्ये, IIT कानपूरद्वारे JEE Advanced परीक्षा आयोजित केली जाणार आहे. परीक्षेसाठी https://jeeadv.ac.in/index.html ही अधिकृत वेबसाइट प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय आणि परदेशी नागरिकांसाठी परीक्षेसाठी पात्रता निकषांसह अधिकृत पोर्टलवर इतर महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यानुसार आता एका विद्यार्थ्याला जेईई ॲडव्हान्स परीक्षेत बसण्यासाठी तीन वेळा संधी देण्यात येणार आहे. 

JEE Advanced परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 1 ऑक्टोबर 2000 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. SC, ST आणि PWD उमेदवारांना पाच वर्षांची सूट दिली जाते. अशा प्रकारे, या उमेदवारांचा जन्म 1 ऑक्टोबर 1995 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. उमेदवाराने 2023 किंवा 2024 किंवा 2025 मध्ये प्रथमच इयत्ता 12वी (किंवा समतुल्य) परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित अनिवार्य विषयांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच जे विद्यार्थी 2022 मध्ये किंवा त्यापूर्वी इयत्ता 12वी (किंवा समतुल्य) परीक्षेत पहिल्यांदा बसले होते ते JEE Advanced 2025 मध्ये बसण्यास पात्र नाहीत.

IIT कानपूर लवकरच JEE Advanced 2025 परीक्षेसाठी माहिती बुलेटिन प्रसिद्ध करेल. यामध्ये परीक्षेची तारीख, नोंदणी प्रक्रिया, अर्ज फी, परीक्षा पॅटर्न, अभ्यासक्रम, मार्किंग योजना आणि इतर तपशीलांचा समावेश असेल. यासह अर्ज प्रक्रिया सुरू केली जाईल.