भारतीय पोस्टात नोकरीची संधी! विविधि पदांसाठी भरती सुरू, ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत
इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ippbonline.com ला भेट देऊन या पदासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२४ देण्यात आली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेडने (IPPB) ग्रामीण डाक सेवक(GDS) साठी कार्यकारी पदांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. भरती प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ippbonline.com ला भेट देऊन या पदासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२४ देण्यात आली आहे.
अधिसुचनेनुसार, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) पोस्ट विभागामार्फत (DoP) ३४४ ग्रामीण डाक सेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. हे कर्मचारी बँकेच्या विशिष्ट गरजा पूर्ण करून विविध बँक कार्यालयांमध्ये थेट विक्री आणि संबंधित कामांवर काम करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. उमेदवारांची निवड त्यांच्या पदवीमध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे केली जाईल. शिवाय बँकेने ऑनलाइन चाचणी परीक्षा घेण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.
या भरती प्रक्रियेत सहभागी होणार्या उमेदवाराला ७५० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. तसेच १ सप्टेंबर २०२४ पर्यंत उमेदवारांचे वय २० ते ३५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवार हे भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त किंवा सरकारी नियामक मंडळाद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/बोर्डातील कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय त्याला ग्रामीण डाक सेवक म्हणून किमान 2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.