ICSI CSEET नोव्हेंबर 2024चा निकाल जाहीर
CSEET 2024 नोव्हेंबर सत्र 9 ते 11 नोव्हेंबर 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट (CSEET) उत्तीर्ण होणे ही कंपनी सेक्रेटरी (CS) कोर्सच्या एक्झिक्युटिव्ह प्रोग्राममध्ये नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य अटींपैकी एक आहे. जे विद्यार्थी 12वी उत्तीर्ण झाले आहेत किंवा इयत्ता 12 ची परीक्षा देत आहेत ते CSEET साठी नोंदणी करण्यास पात्र आहेत.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने (ICSI) कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्टचा (CSEET) निकाल (Result) जाहीर झाला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार (candidates) त्यांचे निकाल ICSIच्या https://icsi.edu/home/ या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स प्रविष्ट करावा लागणार आहे.
ICSI CSEET नोव्हेंबर निकाल 2024 डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी https://icsi.edu/home/ या अधिकृत ICSI वेबसाइटवर जावे. नंतर मुख्यपृष्ठावरील ICSI CSEET नोव्हेंबर 2024 निकाल लिंकवर क्लिक करा. स्क्रीनवर एक नवीन पृष्ठ उघडेल त्यावर तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख एंटर करा, त्यानंतर 'लॉग इन' वर क्लिक करा. तुमचा CSEET निकाल तपासा आणि तो डाउनलोड करा. भविष्यातील संदर्भासाठी निकालाची हार्ड कॉपी घ्या.
दरम्यान, CSEET 2024 नोव्हेंबर सत्र 9 ते 11 नोव्हेंबर 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट (CSEET) उत्तीर्ण होणे ही कंपनी सेक्रेटरी (CS) कोर्सच्या एक्झिक्युटिव्ह प्रोग्राममध्ये नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य अटींपैकी एक आहे. याशिवाय जे विद्यार्थी 12वी उत्तीर्ण झाले आहेत किंवा इयत्ता 12 ची परीक्षा देत आहेत ते CSEET साठी नोंदणी करण्यास पात्र आहेत.