IBPS RRB PO भरती परीक्षेचा निकाल जाहीर 

ऑफिसर स्केल II आणि III व ऑफिसर स्केल 1 मुख्य परीक्षेचा निकाल IBPS ने आज म्हणजेच 4 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर केला आहे. निकाल ऑनलाइन मोडद्वारे IBPS च्या अधिकृत वेबसाइट, ibps.in वर निकाल तपासू शकता.

IBPS RRB PO भरती परीक्षेचा निकाल जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पार्सोनेल सिलेक्शनद्वारे (IBPS) ऑफिसर स्केल II आणि III व ऑफिसर स्केल 1 मुख्य परीक्षा (Officer Scale II & III and Officer Scale 1 Main Exam Result Declared) 29 सप्टेंबर 2024 रोजी देशभरात घेण्यात आली. त्यानंतर आता या भरती परीक्षेचा निकाल IBPS ने आज म्हणजेच 4 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर केला आहे. निकाल ऑनलाइन मोडद्वारे IBPS च्या अधिकृत वेबसाइट, ibps.in वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. विद्यार्थी लॉगिन क्रेडेन्शियल्स टाकून निकाल तपासू शकता. तसेच स्कोअर कार्ड डाउनलोड करू शकता. 

असे डाउनलोड करा स्कोअर कार्ड 

स्कोअर कार्ड डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट ibps.in ला भेट द्यावी. वेबसाइटच्या मुख्य पृष्ठावर तुम्हाला निकालाशी संबंधित लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला लॉगिन तपशील प्रविष्ट करून सबमिट करावे लागेल. आता तुमचा निकाल स्क्रीनवर उघडेल जिथून तुम्ही ते तपासू शकाल आणि तुमचे स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकाल. 

मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी, भरतीच्या अंतिम टप्प्यासाठी आमंत्रित केले जाईल. मुलाखतीनंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. नोव्हेंबर/डिसेंबर 2024 मध्ये मुलाखती घेतल्या जाऊ शकतात. मुख्य परीक्षेत विहित कटऑफ गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी प्रवेशपत्र दिले जातील. या भरतीद्वारे, देशभरातील ग्रामीण बँकांमध्ये ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल 1, 2 आणि 3 अंतर्गत एकूण 9 हजार 995 पदांची नियुक्ती केली जाईल.