पुणे पदवीधरमधून हर्षदा देशमुख विजयी; महाविकास आघाडीने गड राखला

दुसऱ्या पसंतीची मते मोजण्याची प्रक्रिया सुरू झाली. विजय उमेदवाराला 1  लाख 13 हजार 113 मध्ये निवडून येण्यास आवश्यक आहेत. त्यातील हर्षदा देशमुख यांनी 1 लाख 11 हजार 510 मते घेतली आहेत.

पुणे पदवीधरमधून  हर्षदा देशमुख विजयी; महाविकास आघाडीने गड राखला

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडीचा विजय होत असल्याचे निश्चित झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या हर्षदा देशमुख 1 लाख 11 हजार 510 मध्ये घेऊन विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी स्मिता जाधव या 1 लाख 2 हजार 634 मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पदवीधर मतदारसंघाचा कोटा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली 2 हजार मते हर्षदा देशमुख यांना पुढच्या फेरीत मिळतील. परिणामी देशमुख यांना विजयी घोषित केले जाईल, अशी सध्याची परिस्थिती आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख विरुद्ध स्मिता जाधव अशी थेट लढत होती. या मतदारसंघातून इतर उमेदवारांना फारशी मते मिळणार नाही, अशी स्थिती होती. हर्षदा देशमुख विरूद्ध स्मिता गावडे यांच्यात थेट लढत होती. त्यामुळे रात्री उशिरा मतपत्रिका वैध अवैध ठरवण्याची प्रक्रिया सुरू असतानाच हर्षदा देशमुख यांना स्मिता जाधव यांच्या पेक्षा पाच ते सहा हजार मते अधिक असल्याचे आढळून आले. त्यामुळे हर्षदा देशमुख यांचा विजय जवळ जवळ निश्चित झाला.

पदवीधर मतदार संघातून विजयासाठी आवश्यक असलेली मतांचा कोटा पूर्ण करण्यात दोन्ही उमेदवार असमर्थ असल्याचे दिसून आले. त्यामुळे दुसऱ्या पसंतीची मते मोजण्याची प्रक्रिया सुरू झाली. विजय उमेदवाराला 1  लाख 13 हजार 113 मध्ये निवडून येण्यास आवश्यक आहेत. त्यातील हर्षदा देशमुख यांनी 1 लाख 11 हजार 510 मते घेतली आहेत. त्यामुळे अवघ्या दोन हजार मतानंतर हर्षदा देशमुख या अधिकृतपणे विजयी घोषित केल्या जातील. सध्या मतमोजणीच्या एकूण 34 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित फेरांमध्ये मिळणाऱ्या मतांच्या आधारे विजयी उमेदवार घोषित केला जाणार आहे.