पुण्यात जर्मन भाषा शिकवण्यासाठी पाच प्रशिक्षण केंद्र सुरू होणार..

जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग या राज्याला महाराष्ट्रातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी पात्र ठरणाऱ्या युवकांना राज्य सरकारतर्फे मोफत जर्मन भाषा शिकवली जाणार आहे.

पुण्यात जर्मन भाषा शिकवण्यासाठी पाच प्रशिक्षण केंद्र सुरू होणार..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विदेशात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरूणांसाठी महत्त्वाची अपडेट (Important update for youth) समोर आली आहे. जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग या राज्याला महाराष्ट्रातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी पात्र ठरणाऱ्या युवकांना राज्य सरकारतर्फे मोफत जर्मन भाषा शिकवली जाणार (German language will be taught) आहे. मात्र, युवकांना जर्मन भाषा शिकवण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पाच प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार (Five training centers will be started) आहेत. अशी माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बाळकृष्ण वाटेकर (Principal Balkrishna Watekar) यांनी दिली आहे.

युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमरता असल्याने राज्यातील कुशल युवकांना युरोपीय देशांमध्ये नोकरी, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग या राज्याशी फेब्रुवारीमध्ये करार केला. त्या अंतर्गत बाडेन वुटेनबर्ग राज्याला कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जर्मन भाषा शिकवण्यासाठी पुण्यातील गोएथे इन्स्टिट्यूट मॅक्समुलर भवन आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

पथदर्शी तत्त्वावर सुरुवातीला विविध क्षेत्रातील किमान १० हजार कुशल मनुष्यबळ बाडेन वुटेनबर्ग या राज्यास उपलब्ध करून देण्यासाठी एकूण ३० क्षेत्रांची निश्चिती करण्यात आली आहे. नोंदणी करून पात्र ठरलेल्या उमेदवारांना राज्य सरकारकडून मोफत जर्मन भाषेचे शिक्षण दिले जाणार आहे. त्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड येथे पाच प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, असे वाटेकर यांनी सांगितले. एखाद्यावेळी बाडेन-वुटेनबर्ग राज्याचा अभ्यासक्रम आणि महाराष्ट्रातील अभ्यासक्रमात तफावत असल्यास ती दूर करण्यासाठी, गरजेनुसार क्षेत्रनिहाय कौशल्यवृद्धीसाठी युवकांना सरकारकडून मोफत कौशल्यवृद्धीचे अतिरिक्त प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.