CLAT 2025 नोंदणीच्या अंतिम मुदतीत वाढ
परीक्षेची तारीख 1 डिसेंबर 2024 (CLAT 2025 परीक्षा तारीख) आहे. ही परीक्षा दुपारी २ ते ४ या दोन तासांसाठी पेन आणि पेपर पद्धतीने घेतली जाईल. परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल. पेपरचे माध्यम इंग्रजी असेल. परीक्षेत एकूण 120 वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या (National Law Universities) कन्सोर्टियमने कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट (Common Law Admission Test by Consortium) CLAT 2025 साठी नोंदणी करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ (Extension of registration deadline) करण्यात आली आहे. यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटीसनुसार, उमेदवारांना अर्ज (aplication) करण्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत वेळ होता. मात्र, आता ही मुदत 22 ऑक्टोबरपर्यंत (Till 22 october) वाढवण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ( candidates) अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.
अधिकृत अधिसूचनेनुसार, CLAT 2025 परीक्षेची तारीख 1 डिसेंबर 2024 असणार आहे. ही परीक्षा पेन आणि पेपर पद्धतीने ऑफलाइन दुपारी २ ते ४ या वेळेत होणार आहे. या पेपरचे माध्यम इंग्रजी असेल. परीक्षेत एकूण 120 वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील. उमेदवारांना प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण मिळतील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण नकारात्मक असतील. या परीक्षेद्वारे देशभरातील 25 संस्थेत प्रवेश घेता येईल.
सामान्य आणि इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना नोंदणी शुल्क म्हणून 4,000 रुपये भरावे लागतील. तर अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि दारिद्र्यरेषेखालील (BPL) प्रवर्गातील उमेदवारांना 3,500 रुपये भरावे लागतील. CLAT 2025 नोंदणी शुल्क क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन भरले जाऊ शकते.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम consortiumofnlus.ac.in. या अधिकृत वेबसाइट वर जावे. होम पेजवर उपलब्ध असलेल्या ॲप्लिकेशन लिंकवर क्लिक करा. स्वतःची नोंदणी करा. अर्ज भरा. आवश्यक शुल्क भरा. सबमिट वर क्लिक करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.