B.Ed/M.Ed अभ्यासक्रम एक वर्षाचा, मात्र केवळ 'हेच' उमेदवार असणार पात्र

एक वर्षाच्या बी.एड कार्यक्रमासाठी ज्यांनी चार वर्षांचा पदवी किंवा पदव्युत्तर कार्यक्रम पूर्ण केला आहे तेच उमेदवार पात्र असतील. तीन वर्षांचा पदवीधर कार्यक्रम पूर्ण केलेल्यांना हा अभ्यासक्रम उपलब्ध राहणार नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांचा बी.एड कार्यक्रम सुरू राहील, असेही अरोरा यांनी स्पष्ट केले आहे. 

B.Ed/M.Ed अभ्यासक्रम एक वर्षाचा, मात्र केवळ 'हेच' उमेदवार असणार पात्र

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

बी.एड/एम.एड अभ्यासक्रमात (B.Ed/M.Ed courses) जवळपास एक दशकानंतर मोठा बदल करण्यात आला आहे. शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून बी.एड/एम.एड अभ्यासक्रम (Changes in B.Ed/M.Ed curriculum from academic session 2025-26) एक वर्षाचा करण्यात आल्याची माहिती, एनसीटीईचे अध्यक्ष पंकज अरोरा (NCTE President Pankaj Arora) यांनी दिली. यावेळी ते म्हणाले, एक वर्षाचा बी.एड/एम.एड अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याचा अर्थ असा नाही की, दोन वर्षाचा अभ्यासक्रम रद्द केला जात आहे. एक वर्षाच्या एम.एड अभ्यासक्रम पूर्णवेळ असेल, तर शिक्षक आणि शिक्षण प्रशासकांसारख्या काम करणाऱ्यांना दोन वर्षांचा अर्धवेळ अभ्यासक्रम दिला जाईल. तसेच एक वर्षाच्या बी.एड कार्यक्रमासाठी (One year B.Ed/M.Ed program), ज्यांनी चार वर्षांचा पदवी किंवा पदव्युत्तर कार्यक्रम पूर्ण केला आहे तेच उमेदवार पात्र असतील. तीन वर्षांचा पदवीधर कार्यक्रम पूर्ण केलेल्यांना हा अभ्यासक्रम उपलब्ध राहणार नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांचा बी.एड कार्यक्रम सुरू राहील, असेही अरोरा यांनी स्पष्ट केले आहे. 

अनेक दशकांपासून एक वर्ष चालणाऱ्या बी.एड आणि एम.एड कार्यक्रमांना २०१४ मध्ये एनसीटीई ने नियमावली अंतर्गत दोन वर्षांपर्यंत वाढवले होते. २०१४ च्या नियमावली अंतर्गत बी.एड अभ्यासक्रमात २० आठवड्यांची इंटर्नशिप सुरू करण्यात आली होती. त्याची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने, बी.एड कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आला होता. मात्र, आता एनसीटीईच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नियमावली २०२५ चा मसुदा मंजूर करण्यात आला. त्यानुसार बी.एड/एम.एड अभ्यासक्रम एक वर्षाचा करण्यात आला आहे. 

आयसीटीपी हा चार वर्षांचा कार्यक्रम (बीए बी.एड/ बी.एससी बी.एड/ बी.कॉम बी.एड), २०२३-२४ शैक्षणिक सत्रापासून ५७ संस्थांमध्ये पायलट पद्धतीने सुरू करण्यात आला. हा कार्यक्रम १२ वी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. २०२५-२६ सत्रापासून, आयटीईपी आता पायलट पद्धतीने सुरू राहणार नाही आणि शिक्षक शिक्षणाचा नियमित कार्यक्रम असेल. म्हणजेच या वर्षापासून संस्था हा अभ्यासक्रम देण्यासाठी मान्यता मिळवू शकतात, असे अरोरा म्हणाले. २०२५-२६ सत्रापासून आयटीईपी योग, शारीरिक शिक्षण, संस्कृत शिक्षण आणि कला शिक्षण हे चार विशेष आयटीईपी कार्यक्रम देखील सुरू केले जातील, असे त्यांनी सांगितले. 

आभ्यासक्रमांबाबत अरोरा यांनी सांगितले की, "बारावीनंतर, जर कोणी शाळेत शिक्षक व्हायचे ठरवले तर आयटीईपी आहे. जर त्यांनी तीन वर्षांच्या पदवीनंतर निर्णय घेतला तर दोन वर्षांचा बी. एड. करण्याचा पर्याय आहे. पदव्युत्तर पदवी किंवा चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमानंतर, एक वर्षाचा बी.एड. दिला जात आहे. हे तीनही कार्यक्रम वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.