पंजाब अँड सिंध बँकेत स्थानिक बँक अधिकारी पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू!

स्थानिक बँक अधिकाऱ्यांच्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांना स्थानिक भाषा अवगत असणे महत्त्वाचे आहे. लॅटरल एंट्री अंतर्गत, उमेदवाराकडे  पदवीसह १८ महिन्यांचा अनुभव असणे देखील आवश्यक आहे.

पंजाब अँड सिंध बँकेत स्थानिक बँक अधिकारी पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू!
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
बँकेत सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी नवीन भरती जाहीर झाली आहे. पंजाब अँड सिंध बँकेने (Punjab and Sindh Bank) स्थानिक बँक अधिकारी (Local bank officer) LBO पदासाठी अर्ज मागवले आहेत. (Applications are invited for the post) बँकेची ही भरती महाराष्ट्रासह ६ राज्यांसाठी जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी  २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर punjabandsindbank.co.in  अर्ज करू शकतात.
 
स्थानिक बँक अधिकाऱ्यांच्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांना स्थानिक भाषा अवगत  असणे महत्त्वाचे आहे. लॅटरल एंट्री अंतर्गत, उमेदवाराकडे  पदवीसह १८ महिन्यांचा अनुभव असणे देखील आवश्यक आहे. या भरतीमध्ये सामील होण्यासाठी उमेदवारांचे किमान वय २० वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे असावे. म्हणजेच, उमेदवारांचा जन्म २ फेब्रुवारी १९९५ पूर्वी आणि १ फेब्रुवारी २००५ नंतर झालेला नसावा. राखीव प्रवर्गांना नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
 उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. अर्ज करताना सामान्य/ईडब्ल्यूएस/ओबीसी उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ८५० रुपये भरावे लागतील. तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

ऑनलाइन अर्जाव्यतिरिक्त, उमेदवारांना बँकेत इतर कोणतेही कागदपत्रे पाठवावी लागणार नाहीत. लेखी परीक्षेत इंग्रजी भाषा, बँकिंग ज्ञान, सामान्य ज्ञान, अर्थशास्त्र, संगणक अभियोग्यता या विषयांवरून एकूण १२० प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल. परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेतून घेतली जाईल.