RTE Admission : 'आरटीई' च्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशाला सुरुवात ; १२ जूनपर्यंत घेता येणार प्रवेश      

प्रतीक्षा यादीतील प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांना ३० मे ते १२ जून या कालावधीत प्रवेश घेण्यास मदत दिली आहे,

RTE  Admission : 'आरटीई' च्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशाला सुरुवात ; १२ जूनपर्यंत घेता येणार प्रवेश      
RTE Admission News Update

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क                                        

Right To Education (RTE) शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) राबविल्या जात असलेल्या २५ टक्के आरक्षित जागांवरील आरटीई ऑनलाईन प्रवेश (RTE online admission) प्रक्रियेतील नियमित प्रवेश फेरीनुसार राज्यातील ६४ हजार २५६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. आता प्रतीक्षा यादीतील प्रवेशास (waiting list admission) पात्र विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांना ३० मे ते १२ जून या कालावधीत प्रवेश घेण्यास मदत दिली आहे, प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती आरटीई प्रवेशाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

हेही वाचा : विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके मिळणार, पण जुन्या पुस्तकांचे काय? बालभारतीच्या संचालकांनी दिली माहिती


 आरटीई प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनलाइन लॉटरीद्वारे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागातर्फे प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली होती.त्यासाठी वेळोवेळी मुदतवाढही देण्यात आले. नियमित फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहेत. नियमित प्रवेश फेरीसाठी ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांचे निवड करण्यात आली होती. त्यातील ६४ हजार २५६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यात पुणे जिल्ह्यात १५ हजार ५०१ विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक १० हजार ७५२ विद्यार्थ्यांना नियमित फेरीतून प्रवेश मिळाला.


 राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आरटीईच्या रिक्त जागांसाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली आहे. प्रतीक्षा यादीतील २५ हजार ८९० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड केली आहे. त्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ४ हजार ४९२ विद्यार्थी, नाशिक जिल्ह्यात १ हजार ३६८ विद्यार्थी, नागपूर जिल्ह्यात २ हजार १७ विद्यार्थी, मुंबई जिल्ह्यात १ हजार ३३७ विद्यार्थी, औरंगाबाद जिल्ह्यात १ हजार ३२० विद्यार्थी तर ठाणे जिल्ह्यात २ हजार ९७५ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादीतील प्रवेश फेरीसाठी निवड केली आहे. मंगळवारी (दि.३०) दुपारपर्यंत सुमारे ८५  विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चित झाले होते.