मुंबई विद्यापीठाच्या पेट परीक्षेचा प्रवेश अर्ज भरण्यास पुन्हा मुदतवाढ ; आता या वेळेपर्यंत भरा अर्ज 

परीक्षेचे प्रवेशअर्ज भरण्यास चारही विद्याशाखेतील विविध ७७ विषयांसाठी ही परीक्षा दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट ( सीबीटी) पद्धतीने विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या पेट परीक्षेचा प्रवेश अर्ज भरण्यास पुन्हा मुदतवाढ ; आता या वेळेपर्यंत भरा अर्ज 
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
मुंबई विद्यापीठातर्फे (Mumbai University) आयोजित करण्यात येत असलेल्या पी.एच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा (Ph.D. Pre-Entrance Test) पेट परीक्षेचे प्रवेशअर्ज भरण्यास पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे (deadline for filing applications has been extended again.) . आता इच्छुक आणि पात्र उमेदवार आज म्हणजे  6  नोव्हेंबर मध्यरात्री पर्यंत अर्ज करू शकतात. ही अंतिम मुदतवाढ असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.   

या परीक्षेसाठी आतापर्यंत 4 हजार 73 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे.  परीक्षेचे प्रवेशअर्ज भरण्यास चारही विद्याशाखेतील विविध ७७ विषयांसाठी ही परीक्षा दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट ( सीबीटी) पद्धतीने विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे. सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या दोन तासाच्या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. 
  
 https://uompet2024.formsubmit.in/ या संकेतस्थळावर अर्ज  उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापूर्वीही अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. यापूर्वी ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार होता.