बडतर्फ प्राध्यापिकेस रुजू करून न घेतल्याने प्राचार्यांची मान्यताच रद्द

छत्रपती संभाजीनगर येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने एका महाविद्यालयांच्या प्राचार्यांवर मोठी कारवाई केली आहे. खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालायेच प्राचार्य डाॅ. शंकर अंभोरे यांच्या प्राचार्य पदाची मान्यता रद्द करण्याची मोठा निर्णय घेण्यात आली आहे.

बडतर्फ प्राध्यापिकेस रुजू करून न घेतल्याने प्राचार्यांची मान्यताच रद्द

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

छत्रपती संभाजीनगर येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) एका महाविद्यालयांच्या प्राचार्यांवर मोठी कारवाई केली आहे. खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालायेच (Kohinoor College of Arts, Commerce and Science, Khultaabad) प्राचार्य डाॅ. शंकर अंभोरे (Principal Dr. Shankar Ambhore) यांच्या प्राचार्य पदाची मान्यता रद्द (Revocation of recognition of the post of Principal) करण्याची मोठा निर्णय घेण्यात आली आहे. महाविद्यालयातील बडतर्फ प्राध्यापिकेस न्यायालयाच्या आदेशानंतरही रुजू करून घेतले नाही. प्राचार्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका प्रशासनाने ठेवत ही कारवाई केली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. 

कोहिनूर महाविद्यालयाच्या प्राचार्यास विद्यापीठातील शैक्षणिक उपकुलसचिवांनी पाठविलेल्या आदेशात म्हटले की, प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांच्या निर्देशाप्रमाणे महाविद्यालयातील सहायक प्राध्यापिका डॉ. प्रज्ञा शंकरराव काळे यांना न्यायालयीन आदेशाप्रमाणे प्राचार्यानी महाविद्यालयात रुजू करून घेतले नाही. त्यामुळे प्राचार्य म्हणून कामामध्ये कसूर केल्याचे निदर्शनास आल्याने आहे. या नोटीसचा प्राचार्यांकडून खुलासा मागवण्यात आला होता, मात्र तो समाधानकारक नसल्याने २०१६ च्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमाच्या कलम (१३) (च) प्रमाणे सदर मान्यता काढून घेण्यात आली आहे. 

विद्यापीठ प्रशासनाने पाठविलेल्या नोटीसला सविस्तर उत्तर दिले. संबंधित संस्था ही अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे. संस्थेचे अध्यक्ष व सचिवांनी लेखी आदेशाद्वारे प्रा. प्रज्ञा काळे यांना रुजू करून घेऊ नये, अशी ताकीद दिलेली आहे. न्यायालयानेही निर्णयात प्राचार्यांना कोणतेच आदेश केले नाहीत. त्यामुळे अवमान याचिकेशी प्राचार्यांचा संबंध येत नाही. शिक्षण संस्थेच्या घटनेनुसार एखाद्या कर्मचाऱ्यास रुजू करून घेणे, निलंबित करणे व इतर सर्व निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार संस्थेचे अध्यक्ष, सचिव व कार्यकारी मंडळास आहेत. त्यामुळे प्रा. काळे यांना कोणत्या नियमानुसार रुजू करून घ्यावे याविषयी प्रकुलगुरूंकडे मार्गदर्शन मागविले. मात्र, त्यांनी कोणतेही मार्गदर्शन केले नाही. याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, अशी भूमिका प्राचार्य डाॅ. शंकर अंभोरे यांनी मांडली आहे.