MBBS अभ्यासक्रमात नैतिक मूल्ये, संवाद कौशल्ये आणि व्यावसायिकता विकसित करण्यावर भर

एनएमसीच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नैतिक मूल्ये, संवाद कौशल्ये आणि व्यावसायिकता विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे.

MBBS अभ्यासक्रमात  नैतिक मूल्ये, संवाद कौशल्ये आणि व्यावसायिकता विकसित करण्यावर भर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

एमबीबीएसचा (MBBS) अभ्यास करणाऱ्या किंवा NEET परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. भारतातील वैद्यकीय शिक्षणाची पद्धत बदलली आहे. नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) आता MBBS अभ्यासात सक्षमता-आधारित वैद्यकीय शिक्षण (CBME) अभ्यासक्रम लागू करणार आहे. यासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) जारी करण्यात आली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नैतिक मूल्ये, संवाद कौशल्ये आणि व्यावसायिकता विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. यात AETCOM (Attitude, Ethics and Communication) नावाचे नवीन मॉड्यूल (New module) सादर केले गेले आहे, जे भविष्यातील डॉक्टरांमध्ये या आवश्यक गोष्टी विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.

याबरोबरच, CBME मार्गदर्शक तत्त्वे भारतातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांसाठी अनिवार्य असणार आहे. या तत्वांचे संस्थांना काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे 2024-25 च्या MBBS बॅचपासून लागू होतील.

NMC ने लागू केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार, नवीन अभ्यासक्रमात काही म्हत्वपूर्ण बदल केले आहेत. योग्यतेवर आधारित वैद्यकीय शिक्षण, हा अभ्यासक्रम भारतीय वैद्यकीय पदवीधरांच्या नवीन विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा पुरवठादार म्हणून काम करण्यासाठी नवीन डॉक्टर तयार होतील. त्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि दृष्टी या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. 

नवीन अभ्यासक्रमात विद्यार्थी केवळ सैद्धांतिक संकल्पनांशी परिचित होणार नाहीत तर ते त्यांच्या ज्ञांनाचा वापर व्यवहारिक परिस्थितींमध्ये देखील करू शकतात. हा अभ्यासक्रम असे वैद्यकीय पदवीधर तयार करण्यावर लक्ष केंद्रित करेल जे त्यांच्या सरावाच्या पहिल्या दिवसापासून वास्तविक जीवनातील परिस्थिती हाताळण्यासाठी तयार असतील.