नामांकित विद्यापीठांमध्ये डिस्टन्स एज्युकेशन अंतर्गत एमबीएची संधी
पूर्वी विद्यार्थ्यांना डिस्टन्स एज्युकेशन अंतर्गत एमबीए अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी नव्हती. परंतु, आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त व दुरुस्त अध्ययन प्रशालेच्या माध्यमातून बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, बॅचलर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन, मास्टर ऑफ कॉमर्स, मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, मास्टर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन आदी अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केवळ बीए, बी.कॉम, बीएस्सी नाही तर आता बीबीए, बीसीए आणि एमबीए सारखे अभ्यासक्रम सुद्धा डिस्टन्स एज्युकेशन अंतर्गत पूर्ण करता येणार (BBA, BCA and MBA can also be completed under distance education) आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह सिंबायोसिस, डी. वाय.पाटील विद्यापीठ, भारती विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ (Savitribai Phule Pune University, Symbiosis, d. Y. Patil University, Bharti University, Mumbai University, Shivaji University) आदी विद्यापीठात बीबीए, बीसीए आणि एमबीए सारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून या अभ्यासक्रमाला विद्यार्थी प्रवेश (Admission) घेऊ शकतात.
विद्यापीठ अनुदान आयोगाने काही वर्षांपूर्वी एमबीएसारख्या अभ्यासक्रमांना डिस्टन्स एज्युकेशन अंतर्गत शिकवण्यास परवानगी नाकारली होती. परंतु, आता पुन्हा ही परवानगी दिल्यामुळे पुण्यासह काही अभिमत व खाजगी विद्यापीठांनी एमबीए अभ्यासक्रम डिस्टन्स अंतर्गत शिकवण्यास सुरुवात केली. त्यातच गेल्या काही वर्षांपासून डिस्टन्स एज्युकेशन अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. एमबीएसारखा अभ्यासक्रम डिस्टन्स अंतर्गत शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे एमबीए करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात केवळ बीए ,बी.कॉम. एम.ए.,एम. कॉम., सारखे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले होते.आता त्यात भर पडणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना डिस्टन्स एज्युकेशन अंतर्गत एमबीए अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी नव्हती. परंतु, आता विद्यापीठाच्या मुक्त व दुरुस्त अध्ययन प्रशालेच्या अंतर्गत बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, बॅचलर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन, मास्टर ऑफ कॉमर्स, मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, मास्टर ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन आदी अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाने या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील व पुण्यातील नामांकित विद्यापीठांना एमबीए अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त व दुरुस्त अध्ययन प्रशालेच्या माध्यमातून एमबीए अभ्यासक्रमासह विज्ञान शाखेचे काही अभ्यासक्रम डिस्टन्स एज्युकेशन अंतर्गत पूर्ण करता येणार आहेत. विद्यापीठातर्फे लवकरच या संदर्भातील माहिती प्रसिद्ध केली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.